घरदेश-विदेशभारतात आली पहिली हायड्रोजन कार, नितीन गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

भारतात आली पहिली हायड्रोजन कार, नितीन गडकरींचा संसदेपर्यंत प्रवास

Subscribe

या कारला टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात आलं आहे. यात अॅडवान्स फ्युल सेल बसवण्यात आलाय. हा अॅडवान्स फ्युल सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणानं वीज उत्पन्न करतो. या विजेवरच कार धावते, उत्सर्जनच्या स्वरूपात या कारमधून फक्त पाणी निघते.

नवी दिल्लीः भारतीय रस्त्यांवरही आता लवकरच हायड्रोजन कार धावताना दिसणार आहे. बहुप्रतीक्षित पहिली हायड्रोजन कार भारतात दाखल झाली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बुधवारी या गाडीतून प्रवास केलाय. केंद्रीय मंत्री रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी या अद्ययावत कारमध्ये बसून आज संसदेत पोहोचले आहेत. यादरम्यान स्वच्छ इंधनावर धावणारी ही कार लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.

या कारला टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत बनवण्यात आलं आहे. यात अॅडवान्स फ्युल सेल बसवण्यात आलाय. हा अॅडवान्स फ्युल सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणानं वीज उत्पन्न करतो. या विजेवरच कार धावते, उत्सर्जनच्या स्वरूपात या कारमधून फक्त पाणी निघते.

- Advertisement -

हायड्रोजन कार ही पूर्णतः पर्यावरणाला अनुकूल असल्याचंही नितीन गडकरींनी सांगितलंय. या गाडीनं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. ही कार म्हणजे भारताचं भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या गाड्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु हायड्रो फ्युल सेल कारमधून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युल सेल इलेक्ट्रिक कार लाँच केली होती. देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा या प्रकल्पाचा पहिला उद्देश होता. ही कार टोयोटा आणि किर्लोस्कर यांनी संयुक्तपणे विकसित केलीय. फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही), हायड्रोजनवर चालणाऱ्या सर्वोत्तम शून्य उत्सर्जन उपायांपैकी एक आहे. हे पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. गाडीच्या टेलपाईपमधून( इंधनाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जन बाहेर सोडणारा पाईप) पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन यात होत नाही.

- Advertisement -

काय आहेत Toyota Miraiची वैशिष्ट्ये?

>> ही कार एका चार्जमध्ये ६०० किमी पर्यंत चालू शकते.
>> टोयोटाने मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे.
>> कार पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे.
>> कारच्या मागच्या बाजूला १.४ kWh बॅटरी देण्यात आली आहे.
>> इतर इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा ही कार ३० पट कमी आहे. परंतु एका सिलेंडरवर ६५० किमी प्रवास करू शकते.
>> एका सिलेंडरमध्ये सुमारे ५.६ किलो हायड्रोजन भरला जातो.
>> अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून हरित हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो.
>> हरित हायड्रोजनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि अवलंब करण्यात आलाय.
>> भारतासाठी भविष्यात स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यात ही कार महत्त्वाची भूमिका बजावेल.


हेही वाचाः स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार रिफायनरीसाठी बारसूचा प्रस्ताव, राऊतांची मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -