घरदेश-विदेशविमान उड्डाण होण्यापूर्वी दररोज पायलट, एअर होस्टेसची होणार 'अल्कोहोल टेस्ट'; DGCA चा...

विमान उड्डाण होण्यापूर्वी दररोज पायलट, एअर होस्टेसची होणार ‘अल्कोहोल टेस्ट’; DGCA चा आदेश

Subscribe

कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षे बंद असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरु झाली आहेत. आठवड्याभरापूर्वी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आठवड्यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण याआधी एअर बबल व्यवस्थेअंतर्गत काही देशांसोबत मर्यादित उड्डाणे सुरु होती. अशातच विमान वाहतूक नियामक विभागाने (DGCA) केबिन क्रूशी संबंधित नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे. या नव्या नियमानुसार, आता पायलट आणि केबिन क्रूशीसंबंधीत सर्व कर्मचाऱ्यांची दररोज अल्कोहोल टेस्ट केली जाणार आहे.

DGCA ने निमयात केला मोठा बदल

DGCA ने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आणि महामारीशी संबंधित परिस्थिती सुधारण्यासाठी ब्रेथ एनालायझर (BA) गाईडलाईन्समध्ये सुधारणा केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या नियम बदलानुसार, सर्व विमान कंपन्यांना त्यांच्या पायलट आणि केबिन क्रू मेंबर्सची दररोज अल्कोहोल टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या टेस्टमधून, पायलट किंवा केबिन क्रू मेंबर्स कामावर असताना दारूच्या नशेत आहे की नाही माहीत पडणार आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे अल्कोहोल टेस्ट थांबवण्यात आली

कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डीजीसीएने ही टेस्ट काही काळ थांबवली होती. मात्र नंतर विमान उड्डाणे नियोजनानुसार सुरु झाली तेव्हा फक्त काही मोजक्या कर्मचाऱ्यांची अल्कोहोल टेस्ट केली जात होती. पण आता 50 टक्के केबिन क्रूला हा नियम लागू करण्यात आला आहे. DGCA प्रमुख अरुण कुमार यांनी यावर सांगितले की, ‘विमान वाहतूक सेवा आम्हाला सामान्य स्थिती परत आणायची आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काही प्रोटोकॉल पुन्हा लागू करत आहोत.

‘या’ कर्मचाऱ्यांना रोज करावी लागणार अल्कोहोल टेस्ट

कोरोना महामारीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना ही टेस्ट दररोज करावी लागत होती. जर काही कारणास्तव एखाद्या कर्मचाऱ्याची फ्लाइटच्या आधी चाचणी होऊ शकली नाही, तर त्याला विमान विमानतळावर पुन्हा आल्यानंतर टेस्ट करून घ्यावी लागत होती. मात्र आता बदललेल्या नियमानुसार, प्रत्येक फ्लाइटमधील अर्ध्या कर्मचाऱ्यांची केव्हाही बीए टेस्ट केली जाईल. तसेच फ्लाईट ट्रेनिंग संस्थांच्या निम्म्या इंस्ट्रक्टर्सना दररोज बीएची टेस्ट करावी लागणार आहे. याशिवाय 40 टक्के स्टूडेंट पायटर्सनाही अल्कोहोल टेस्ट करावी लागेल. प्रायव्हेट एअरक्राफ्ट विमानाच्या बाबतीत 50 टक्के क्रू मेंबर्ससाठी ही टेस्ट अनिवार्य असेल.


श्रीनगर चकमकीत दोन दहशतवादी ठार; दहशतवादी रईस ऑनलाइन पोर्टलचा माजी संपादक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -