घरदेश-विदेशचाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करण्यात भारत अग्रेसर!

चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करण्यात भारत अग्रेसर!

Subscribe

चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करण्यात भारत अग्रेसर असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

आज ‘व्हॉट्स अॅप’ ही संकल्पना सर्वसामान्य अशी झाली आहे. देशात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलमध्ये ‘व्हॉट्स अॅप’ असतो. देशातील ७ कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात. या अॅपमार्फत दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक परस्परांशी चॅट करु शकतात. लोक अॅपमार्फत संभाषण करतात. या संभाषणामध्ये लोक एकमेकांविषयीच्या अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतात. मात्र, या व्हॉट्स अॅपवर शेअर करण्यासंबंधी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ‘व्हॉट्स अॅप’वर चाइल्ड पोर्नोग्राफी शेअर करण्यात भारत सर्वात पुढे असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.

हेही वाचा – ‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड’ ची अबुधाबी येथे बालकांच्या संरक्षणार्थ परिषद

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

इस्त्राईलच्या ‘अॅन्टीटॉक्झीन टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअप कंपनीने याबाबतचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात भारतातील ‘व्हॉट्स अॅप’ युझर्स सर्वाधिक प्रमाणात चाइल्ड पोर्नोग्राफी आणि अश्लील मजकूर पसरवीत असल्याचे उघड झाले आहे. या कंपनीने ‘थर्डपार्टी’ अॅप्लिकेशन्सच्या सहाय्याने हा अहवाल तयार केला आहे. या अॅपलिकेशन्सद्वारे अॅडल्ट सेक्शनमधील मजकूर पाहण्यासाठी ‘व्हॉट्स अॅप’च्या माध्यमातून इनव्हीटेशन पाठवले गेले. ‘व्हॉट्स अॅप’ इनव्हीटेशन लिंकच्या माध्यमातून ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्या युझर्सचा अभ्यास करण्यात आला. याविषयी बोलताना ‘अॅन्टीटॉक्झीन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे मुख्य मार्केटिंग अधिकारी रिओ काथ्रे म्हणाले की, ‘अनेक व्हॉट्स अॅप युझर्स चाइल्ड पोर्नोग्राफी असलेला मजकूर अॅपच्या माध्यमातून देवाणघेवाण करतात. माझ्याकडे पक्की आकडेवारी नाही. पण, यामध्ये +९१ ने सुरु होणारे हजारो नंबर आहेत. चाइल्ड पोर्नोग्राफीच्या अनेक ग्रुपमध्ये +९१ ने सुरु होणारे नंबर आहेत’. +९१ हा भारताचा आंतरराष्ट्रीय कोड नंबर आहे. भारताचा प्रत्येक फोन नंबर या आकड्यानेच सुरु होतो.


हेही वाचा – भयानक! फेकलेल्या ‘सॅनिटरी पॅड’चा नशेसाठी वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -