घरदेश-विदेश‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड’ ची अबुधाबी येथे बालकांच्या संरक्षणार्थ परिषद

‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड’ ची अबुधाबी येथे बालकांच्या संरक्षणार्थ परिषद

Subscribe

इंटरनेटवर लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या अल्पवयीन बालकांचे ऑनलाइन संरक्षणासंदर्भात ‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड' संस्थेने आबुधाबी येथे परिषद भरवली होती.

इंटरनेटवर लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या अल्पवयीन बालकांचे ऑनलाइन संरक्षणासंदर्भात ‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड’ संस्थेने परिषद भरवली होती. या परिषदेत लहान मुलांना वैश्विक उपाययोजना शोधण्यासाठी सहाय्य करणे, त्याबाबत जनजागृती करणे आणि त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी देवी (अम्मा) या ‘चाइल्ड डिग्निटी इन डिजिटल वर्ल्ड’ (डिजीटल विश्वातील बाल सन्मान) या उपक्रमाच्या पहिल्या मंचात सहभागी झाल्या. प्रत्यक्ष कृतीसाठी अध्यात्मिक गुरूंच्या आव्हानाचा एक भाग म्हणून या मंचावरून अम्मा यांनी उद्घाटनपर भाषण केले आणि वहात अल् करामा या ऐतिहासिक स्मारकाच्या ठिकाणी आयोजित अध्यात्मिक गुरूंच्या परिषदेत त्या सहभागी झाल्या. आंतरविश्वास आणि बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि वैश्विक स्तरावर प्रभावी अशा पॉन्टीफिशीया विद्यापीठ, युनीसेफ, वी प्रोटेक्ट ग्लोबल अलायन्स, चाइल्ड डिग्निटी इन द डिजीटल वर्ल्ड, अरिगातू इंटरनॅशनल, रिलीजन्स फॉर पीस अँड अॅन्ड व्हायोलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन, अशा अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने या आंतरविश्वास भागिदारी मंचाचे आयोजन करण्यात आले.

काय म्हणाल्या अम्मा?

इंटरनेट, सोशल मिडिया आणि स्मार्टफोनच्या चांगल्या आणि वाईट परिणामांबाबत अम्मांनी भाष्य केले. अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना फार काळजी घेण्याची आवश्यकता आहे, मात्र सध्या ती घेतली जात नाही त्याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. डिजीटल तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया सशक्त आहेत. त्यांचा वापर करताना आपण अतिशय सजगपणे आणि संयमाने वागले पाहिजे. अन्यथा ही वरदानेच विनाशाचे कारण ठरतील. विशेषत: जेव्हा आपण मुलांसाठी फोन आणि टॅबलेट खरेदी करतो तेव्हा पालकांची काटेकोर देखरेख आवश्यक आहे. काही विशिष्ट संकेतस्थळे पालकांनी ब्लॉक केली पाहिजेत, असा सल्ला अम्मांनी यावेळी पालकांना दिला.

- Advertisement -

अम्मा सोबत पाच ज्येष्ठ अध्यात्मिक गुरूंचा पाठिंबा

या प्रसंगी बालकांच्या संरक्षणासाठी अबुधाबीच्या आंतरविश्वासाधारित जाहीरनाम्याला अम्मा आणि पाच ज्येष्ठ अध्यात्मिक गुरूंनी आपला पाठिंबा जाहीर केला. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, संयुक्त राष्ट्राच्या बाल अत्याचार विरोधातील सरचिटणीस विशेष प्रतिनिधी मार्टा सँटोस पैस तसेच संयुक्त राष्ट्राच्या बाल लैंगिक शोषण आणि विक्री विरोधातील विशेष प्रतिनिधी मॉद दे बोअर-बुक्कीचिओ यांनीही या मंचाला संबोधित केले.अबुधाबीचे राजकुमार आणि संयुक्त अरब अमीरातीच्या सशस्त्र बलांचे उप-सर्वोच्च कमांडर, आदरणीय शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या तसेच संयुक्त अरब अमीरातीचे उपपंतप्रधान आणि अंतर्गत मंत्री आदरणीय शेख सैफ बिन झायेद अल नाहयान यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारीणी समितीच्या मार्गदर्शनाखाली, अबू धाबी येथे या मंचाचे आयोजन करण्यात आले.

४५० पेक्षा जास्त अध्यात्मिक गुरूंचा सहभाग

इंटरनेटचा वापर करणाऱ्या जगभरातील ३.२ अब्ज वापरकर्त्यांपैकी मुले आणि किशोरवयीन बालके यांचे प्रमाण एक चतुर्थांश इतके आहे. आणि हे ८०० दशलक्ष वापरकर्ते, लैंगिक अत्याचार, शिकार, शोषण आणि उत्पीडनाला बळी पडण्याचा धोका सातत्याने वाढतो आहे. मायक्रोसॉफ्टने २०१५ साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, इंटरनेटवर बाल लैंगिक अत्याचाराच्या ७ लाख २० हजार प्रतिमा दररोज अपलोड केल्या जातात. सर्व धर्मातील ४५० पेक्षा जास्त अध्यात्मिक गुरू या उपक्रमात सहभागी झाले. अम्मांबरोबरच अल्-अझरचे शाही इमाम आणि ज्येष्ठांच्या मुस्लीम परिषदेचे अध्यक्ष डॉ. अहमद अल्-तय्यब, मनीलाचे आर्च बिशप लुईस अंतोनियो कार्डिनल टॅगल, आदरणीय मेट्रोपॉलीटन इमॅन्युअल, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या कॉन्स्टँटिनोपलच्या सार्वभौम कुलपतींचे एक्स्चार्ज; पोलंडचे मुख्य रब्बी, मायकेल श्ड्रिच, म्योचीकाई गुरू रेव्हरंड केईशी मियामोटो, गुरू नानक निष्काम सेवा जत्थ्याचे अध्यक्ष भाई साहब भाई मोहिंदर सिंग ओबीई केएसजी यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यात समावेश होता.

- Advertisement -

हेही वाचा – बोधगयाच्या बुद्ध विहारात बालकांचे लैंगिक शोषण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -