घरदेश-विदेशवायूसेना दिवस : एअर शोमध्ये विमानांच्या थरारक कसरती

वायूसेना दिवस : एअर शोमध्ये विमानांच्या थरारक कसरती

Subscribe

आज ८७ वा वायुसेना दिवस आहे. यानिमित्त गाझियाबाद येथे हिंडन एअरबेसवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या दिनाचं औचित्य साधत बालाकोट एअर स्ट्राईक दरम्यान महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या वीरांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे. विंग कमांडर अभिनंद वर्थमान यांच्यासह ५१ स्क्वाड्रनचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसंच ९ व्या स्क्वाड्रनलाही युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. तर अवकाशात एअर शोमध्ये विमानांचे थरारक कसरतीही दाखवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, बालाकोट येथे एअरस्ट्राइक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या हवाई दलाच्या जवानांनीही आज झालेल्या संचालनात भाग घेतला होता.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनाच्या शुभेच्छा देत सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेननेची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार दरवर्षी या दिवशी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. वायूसेनेने सोशल मीडियावर पुलवामा हल्ला व एअर स्ट्राईकचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -