घरदेश-विदेशअडीच हजार पर्यटकांना वाचवण्यास जवानांना यश

अडीच हजार पर्यटकांना वाचवण्यास जवानांना यश

Subscribe

सिक्कीम येथे बर्फवृष्टी सुरु असल्यामुळे हवामान खराब आहे. भारत-चीन सीमारेशे जवळ अडकलेल्या अडीच हजार पर्यटकांना भारतीय जवानांनी वाचवले आहेत.

भारत-चीन सीमारेषेजवळ सिक्कीम येथे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. मागील काही दिवसांपासून येथे थंडीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वातावरण खराब आहे. सतत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे नागरि जीवन थांबले आहे. या हीमवृष्टीमध्ये अडकलेल्या २५०० पर्यटकांना वाचवण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. वाचवलेल्या पर्यटकांना संक्रमण शिबिरात नेऊन त्यांना अन्न व पाणी पुरवले जात आहे. या पर्यंटकांना वाचवण्यासाठी जवानांनी एक विशेष मोहीम सुरु केली आहे. भारत-चीन सीमारेषेजवळ नथू ला भागात हे पर्यटक अटकल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवांनानी माहिती मिळताच तत्काळ बचावकार्य सुरु केले आहे.

“पर्यटकांना वाचवण्यासाठी स्थानिकांच्या वाहनांचाही वापर करण्यात आला. ३०० ते ४०० वाहनांमधून या पर्यटकांना १७ मैल दुर सुरक्षित स्थानी पोहचवण्यात आल. याठिकाणी त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय केली आहे. अजूनही काही पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे. काही पर्यटकांना १७ मैल आणि काहींना १३ मैल अंतरावरून वाचवण्यात आले.” – सैन्यदल अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -