घरदेश-विदेशलडाखमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याची कामगिरी

लडाखमध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याची कामगिरी

Subscribe

लडाखमधील श्योक परिसरात अडकलेल्या पर्यटकांची भारतीय सैन्याने सुखरूप सुटका केली.

लडाख येथील श्योक या ठिकाणाला भेट देण्यासाठी गेलेल्या ८१ पर्यटकांची भारतीय सैन्याने सुखरूप सुटका केली आहे.
श्योक परिसरातील पर्तापूर-तुरतूक रस्त्यात अडकलेल्या ८१ पर्यटकांची भारतीय सैन्य दलाने सुखरूप सुटका केली.

त्यानंतर या पर्यटकांची तात्काळ राहण्याची सोय करण्यात येवून त्यांना मेडिकल मदत आणि गरम कपडे पुरविण्यात आले, असे ट्वीट भारतीय सैन्याच्या नॉर्थ कमांडतर्फे करण्यात आले. प्रतिकूल हवामाचा सामना करण्यासाठी बचाव करण्यात आलेल्या सर्वच पर्यटकांना जॅकेट्स, टोपी आणि गरम कपडे पुरविण्यात आले. सैन्य वसाहतीमध्ये आश्रय दिल्यानंतर पर्यटकांना सैन्यातर्फे जेवणाची सोय करण्यात आली. सैन्य वसाहतीमध्ये आश्रयाला असताना पर्यटकांनी भारतीय सैन्याच्या मदतीबद्दल आभार मानणारे संदेश लिहून सैन्याच्या कार्याचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -