घरदेश-विदेशयुक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पोलंडच्या भारतीय दूतावासाची नवी अॅडव्हायजरी; सांगितला बाहेर पडण्याचा मार्ग

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पोलंडच्या भारतीय दूतावासाची नवी अॅडव्हायजरी; सांगितला बाहेर पडण्याचा मार्ग

Subscribe

पोलंडच्या वॉर्सा येथील भारतीय दूतावासाने मंगळवारी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी तातडीने नव्या अॅडव्हायजरी केली आहे. या नव्या अॅडव्हायजरीमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले की, देशाच्या पश्चिम भागातील ल्विव्ह आणि टेर्नोपिलमध्ये अडकलेले भारतीय नागरिक बुडोमिएर्झ सीमेवरून चेक-पॉइंटच्या मदतीने पोलंडमध्ये लवकर पोहचू शकतात.

पोलंडमधील भारतीय दूतावासाने एका निवेदनात पुढे की, “सध्या ल्विव्ह आणि टेर्नोपिल आणि पश्चिम युक्रेनमधील इतर ठिकाणी राहणारे भारतीय बुडोमिएर्झ सीमा चेक-पॉईंटवरून तुलनेने लवकर पोलंडमध्ये पोहोचू शकतात.

- Advertisement -


वैकल्पिकरित्या त्यांना हंगेरी किंवा रोमानिया मार्गे दक्षिणेकडे प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला होता. यामुळे भारतीय नागरिक शेहिनी-मेड्यका येथील गर्दीने भरलेल्या सीमावर जाण्यापासून वाचू शकतात. पोलंडमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, त्यांचे अधिकारी मेड्यका आणि बुडोमिएर्झ  (Medyka – Budomierz Border)  येथील सीमा चौक्यांवर तैनात आहेत, जे युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांचे स्वागत करत त्यांना भारतात अर्थात मायदेशी प्रवास करण्यास मदत करत आहेत.

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अमेरिकन सैन्य उतरणार नाही, मात्र रशियाची मनमानी चालू देणार नाही; joe Biden यांची घोषणा

केंद्रीय मंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग, जे पोलंडमध्ये आहेत. त्यांनी दिल्लीला परत येण्यापूर्वी पोलंडमधील रॅझो विमानतळावर भारतीय विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्याचवेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हंगेरीतील बुडापेस्ट विमानतळावर पोहोचून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची भेट घेतली.

- Advertisement -

दरम्यान मूळचा कर्नाटकचा असलेला एक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात मारला गेल्याने आता भारताने ऑपरेशन गंगा अधिक तीव्र केले आहे. यातून भारत आपल्या नागरिकांना युक्रेनमधून वेगाने बाहेर काढत आहे.

मंगळवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दावा केला की , सर्व भारतीय नागरिकांनी कीव शहर सोडले आहेत. याआधी युक्रेनमधील भारतीय दूतावासाने ताबडतोब ट्रेनने किंवा विद्यार्थ्यांसह सर्व भारतीयांसाठी उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही माध्यमाने कीव सोडण्याची सूचना केली होती.


Sarojini Naidu यांना का म्हटले जाते ‘Nightingale of India’? पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या या खास गोष्टी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -