घरदेश-विदेशपाकिस्तानमधील हिंगलाज माता उत्सवात दोन वर्षांनी भारतीय हिंदू सहभागी

पाकिस्तानमधील हिंगलाज माता उत्सवात दोन वर्षांनी भारतीय हिंदू सहभागी

Subscribe

नवी दिल्ली : कोविड-19 महामारीनंतर दोन वर्षांनी पाकिस्तानातील (Pakisthan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) जुन्या वार्षिक हिंगलाज माता उत्सवाला (Hinglaj Mata festival) पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. या उत्सवात भारतासह इतर देशांतील भाविक सहभागी होतात, भारतातील हिंदूनी दोन वर्षांनी या उत्सवात सहभाग नोंदवला.

बलुचिस्तान प्रांतातील लासबेला जिल्ह्यातील कुंड मालीर भागात असलेले प्राचीन हिंगलाज माता मंदिर हे हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते. हे जगातील पाच प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हिंदू देवी सतीला समर्पित असलेले हिंगलाज मंदिर हे ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. या जगप्रसिद्ध मंदिरात वार्षिक हिंगलाज माता महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र कोविड-19 महामारीमुळे दोन वर्ष हा उत्सव साजरा झाला नव्हता. पण आता या उत्सवाला पुन्हा सुरूवात झाली असून सोमवारी (1 मे) या उत्सवाला पाकिस्तान आणि भारतासह इतर देशांतील भाविकांनी हजेरी लावली. त्याचवेळी भारतीय हिंदूंनी या उत्सवात सहभाग नोंदवला.

- Advertisement -

कष्ट सहन केल्याने हिंगलाज माता मनोकामना पूर्ण करते
मकरन कोस्टल हायवेच्या निर्मितीनंतर ऐतिहासिक मंदिराकडे जाणे आता सहज सोपे झाले असल्याचे एका भाविकाने सांगितले. तो म्हणाला की, किर्थर पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर असल्यामुळे पूर्वी भाविकांना जाणे अवघड होत होते. पण आता सहज सोपे झाले असून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अनेक भाविक अनवाणी डोंगर चढून जाणे पसंत करतात. त्यांच्या मते मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे कष्ट सहन करणार केल्यामुळे हिंगलाज माता प्रसन्न होते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करते.

सरकारकडून 300 दशलक्ष रुपये खर्च
बलुचिस्तानचे अल्पसंख्याक मंत्री खलील जॉर्ज यांनी माध्यमांना सांगितले की, बलुचिस्तान सरकारकडून भाविकांना सुरक्षा देण्यासाठी 1 हजार सुरक्षा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय हिंगलाज माता मंदिरात भाविकांना सर्व मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकारने 300 दशलक्ष रुपये खर्च केले आहेत, मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

बेनझीर भुट्टो यांची भाची शिवमंदिरात
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची भाची फातिमा भुट्टो हिने लग्नानंतर हिंदू मंदिरात जाऊन जगासमोर नवा आदर्श ठेवला आहे. सोशल मीडियावर लोक तिच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत, तर काही कट्टरपंथी तिच्यावर टीका करत आहेत. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे भाऊ दिवंगत मुर्तझा भुट्टो यांची मुलगी फातिमा (40) हिने तिचे आजोबा झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कराचीतील लायब्ररीत शुक्रवारी ग्रॅहम जिब्रान यांच्याशी लग्न केले. तिने नवऱ्यासोबत शिवलिंगावर जलाभिषेकही केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -