घरदेश-विदेशव्यापार वाटाघाटीसाठी भारत उत्तम - डोनाल्ड ट्रम्प

व्यापार वाटाघाटीसाठी भारत उत्तम – डोनाल्ड ट्रम्प

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमात काल सहभाग घेतला. “नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. भारतीय लोक हे व्यापाराच्या वाटाघाटीसाठी उत्तम आहेत.” असे मत ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केले. दिवाळीनिमित्त भरभराट आणि शांती प्रस्थापित व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

व्हाईट हाऊसच्या रुझवेल्ट दालनात हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. ट्रम्प यांनी दीप प्रज्वलन करत सोहळ्याची सुरुवात केली. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचे ट्रम्प यांचे हे दुसरे वर्ष असून अमेरिकेतील भारतीयांसोबत ट्रम्प दिवाळी साजरी करतात. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “युनायटेड स्टेट्सचे भारताबरोबर घनिष्ठ संबंध असून मोदी माझे मित्र आहेत.”

- Advertisement -

“आम्ही भारतासोबत व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत आहोत आणि भारतात चांगले उद्योजक असून ते चांगली वाटाघाटी करतात. तुम्ही त्यांना सर्वात बेस्ट बोलू शकता. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत जास्तीतजास्त करार करत आहोत.”, असे प्रतिपादन करताना ट्रम्प म्हणाले की भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे देश आहेत.

- Advertisement -

या कार्यक्रमाला ट्रम्प प्रशासनातील वीस हून अधिक अमेरिकन भारतीय अधिकारी उपस्थित होते. तसेच अमेरिकेच्या भारतीय दुतावासातील राजदूत नवतेज सिंह सारना, त्यांच्या पत्नी डॉ. अविना सारना आणि त्यांचे विशेष सहाय्यक प्रतिक माथुर यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते.

मोदी माझे मित्र असून आता तर इवांकाही त्यांची मैत्रिण झाली आहे. माझ्या मनात भारत आणि भारतीयांबद्दल आदर आहे. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुलगी इवांकालाही उपस्थितांसमोर आणले. इवांकाने मागच्या वर्षीच भारताला भेट दिली होती. ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी ती पहिलीच आहे जिने भारताला भेट दिली होती.

भारतीय राजदूत सारना यांनी ट्रम्प यांनी दिवाळी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. अमेरिका आणि भारत यांचे संबंध पुर्वीपेक्षा अधिकाधिक जवळचे झाले असल्याचा दावा सारना यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -