Lockdown : पोटाच्या भुकेसाठी लॉकडाऊनचे उल्लंघन!

तो व्यक्ती आपल्या लहान दोन मुलांसह प्रवास करत होता. हा प्रवास फक्त पोटाची भूक भागविण्यासाठी केला जात होता.

कोरोना पार्श्वभूमीवर जगभरात काही देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असून देशातील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अशावेळी एका युकेमधील नागरिकाने लॉकडाऊनचे उल्लंघन करून ताशी १७७ वेगाने प्रवास करताना पोलिसांनी त्याला पकडले. ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तू प्रवास का करत आहेस, असे विचारले असता त्या व्यक्तीने सांगितले की, लंडनमध्ये ब्रेड १ युरोने स्वस्त असल्यामुळे ते घेण्यासाठी जात आहे. मिळालेल्या माहिती नुसार, तो व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह प्रवास करत होता. हा प्रवास फक्त पोटाची भूक भागविण्यासाठी केला जात होता.

द लिस्टरशायर रोड्स पोलिसिंग युनिट (आरपीयु) यांनी ही घटना आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. घरी राहा. एनएचएस संरक्षित करा. जतन करा, अशी सूचना आरपीयु यांनी दिल्या आहेत. एम-१ उत्तरेच्या दिशेने एक वाहन वेगाने धावत होते. या व्यक्तीने हा प्रवास नॉटिंगहॅम येथून सुरू केला होता. लंडनमध्ये ब्रेड खरेदी करण्यासाठी हा प्रवास केला जात होता. कारण तिथे एक युरोमध्ये ब्रेड मिळत होता. तसेच वाहनामध्ये दोन लहान मुलंही होती. याची सर्व माहिती न्यायालयाकडे कळविण्यात आले आहे, असे लिस्टरशायर रोड्स पोलिसिंग युनिट (आरपीयु) यांनी सांगितले.

या ट्विटला मिळालेल्या काही रोचक प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने सांगितले की, ‘तुम्ही त्याला सांगायला हवे होते, स्वतः ब्रेड बनविणे हे अगदी स्वस्त आहे.’

संबंधित व्यक्तीवर दोन दंड ठोठावण्यात आले आहेत. आरोग्य संरक्षण विनियम २०२० अंतर्गत ६० युरो इतका दंड आकारण्यात आला आहे, असेही एका व्यक्तीने सांगितले.

‘लॉकडाऊनमध्ये युकेमध्ये ही एकमेव विचित्र रस्ते वाहतूक घटना नव्हती,’ अशीही प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली.

एका नेटकऱ्याने पोलिसांना सांगितले की, ‘मी खाण्या-पिण्याच्या वस्तू मोठया प्रमाणात खरेदी केल्या आहेत. कारण लॉकडाऊनमुळे आपण घराबाहेर पडू शकत नाही.’