घरCORONA UPDATEअमेरिकेत २४ तासांत २ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

अमेरिकेत २४ तासांत २ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Subscribe

अमेरिकेत २४ तासांत तब्बल २ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १२ हजार ७२२ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने अमेरिकेत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेत २४ तासांत तब्बल २ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून आतापर्यंत १२ हजार ७२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत ३ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे अमेरिका देश कोरोनामुळे हादरुन गेला आहे.

- Advertisement -

जगात ८१ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन देखील केले आहे. मात्र, लॉकडाऊन करुन देखील मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. तर अमेरिकेत कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगभरात आतापर्यंत ८१ हजार कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपियन देशांमध्ये झाला आहे. तर स्वीडनमध्ये गेल्या २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर फ्रान्समध्ये देखील कोरोनामुळे १० हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर भारतात आतापर्यंत १२४ लोकांचा मृत्यू झाला असून देशात आतापर्यंत ४ हजार ७८४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३२५ लोक कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत.


हेही वाचा – १४ महिन्याच्या बाळाची कोरोनाशी झुंज संपली

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -