घरदेश-विदेशIndigo Aircraft tyre Bursts: हुबळीत विमानाच्या लँडिंग दरम्यान टायर फुटलं; सुदैवाने प्रवासी...

Indigo Aircraft tyre Bursts: हुबळीत विमानाच्या लँडिंग दरम्यान टायर फुटलं; सुदैवाने प्रवासी सुखरूप

Subscribe

कन्नूर येथून कर्नाटककडे येत असलेल्या इंडिगो विमानातील सर्व प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळीच कर्नाटकातील हुबळी विमानतळावर इंडिगोचे विमान लँड होत होते, आणि या लँडिंगदरम्यान या विमानाचं टायर फुटले. मात्र, विमानातीलमधील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, अशी माहिती मंगळवारी विमान कंपनीकडून देण्यात आली. विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अपघातग्रस्त विमान देखभाल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. इंडिगोचे उड्डाण 6e -7979 कन्नूरहून हुबळीला जात होते. सोमवारी सायंकाळी लँडिंग दरम्यान ही घटना घडली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मंगळवारी विमान कंपनीने एक प्रसिध्दीपत्रक देखील जारी केले.

एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने असे सांगितले की, सोमवारी रात्री ८.०३ वाजता विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला परंतु उलट दिशेने जोरदार वारा असल्याने ते शक्य झाले नाही. यानंतर साधारण अर्ध्या तासाने या विमानाचे लँडिंग करण्यात आले.

- Advertisement -

यासह अधिकाऱ्याने असेही सांगितले की, “लँडिंग करताना आलेली अडचण आणि विरुद्ध दिशेने जोरदार वारा यामुळे कदाचित विमानाचे टायर फुटल्याची घटना घडली. विमानात बसलेले सर्व प्रवासी स्वतःहून खाली उतरले आणि दुपारी अडीच वाजता या विमानाने पुन्हा टेकऑफची तयारी केली. सध्या या विमानाचे काम आता पूर्ण झाले असून या घटनेची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलरला देण्यात आली आहे.


Antilia bomb scare case: अँटिलिया प्रकरणात NIAने दोन जणांना केली अटक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -