घरमनोरंजनAmazonPrime : 'मैं शेरनी' टायटल ट्रॅकमध्ये विद्याचा दमदार अंदाज

AmazonPrime : ‘मैं शेरनी’ टायटल ट्रॅकमध्ये विद्याचा दमदार अंदाज

Subscribe

सिनेमामध्ये विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘शेरनी’ हा विद्या बालनचा वेगळ्या धाटणीचा नाट्यमय सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने ‘मैं शेरनी’ हे दमदार गाणे प्रदर्शित केले आहे. अभिनेत्री विद्या बालन बॉलिवूडमध्ये डरकाळी फोडण्यास सज्ज झाली आहे.  या सिनेमामध्ये विद्या एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरला पाहून चाहत्यांच्या मानत सिनेमा पाहण्याची उस्तुक्ता वाढू लागली आहे. सिनेमाचा ट्रेलर रोमांचक असून विद्याच्या प्रवासावर भाष्य करतो. आपल्या अनुभवाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तिरेखांनी भरलेले हा सिनेमा आहे. यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. तगून राहण्याच्या जिद्दीची यशोगाथा मांडणारे हे खास गाणे अकासा आणि रफ्तार यांनी गायले आहे. पारंपरिक समजुतींना मोडीत काढत सर्व आव्हानांविरोधात ठामपणे उभे राहत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या शेरनींच्या साहसाला या गाण्यातून सलाम करण्यात आला आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये मिरा एर्डा (F4 रेसर आणि ड्रायव्हर कोच), नताशा नोएल (बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर आणि योगा ट्रेनर), एश्ना कुट्टी (सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर) आणि त्रिनेत्रा हलदार (कर्नाटकातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर), जयश्री माने (बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी), रिद्धी आर्या (आघाडीच्या लढवय्यांना जेवण पुरवणारी विद्यार्थिनी), अनिता देवी (सुरक्षा रक्षक), सीमा दुग्गल (शिक्षिका), अर्चना जाधव (घरकाम) यांच्यासोबत विद्या बालन दिसणार आहे. राघव यांनी लिहिलेले ‘मैं शेरनी’ या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे. अमेझॉन प्राइम म्युझिक, स्पॉटीफाय, गाना, सावन, विंक अशा सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर 15 जून रोजी हे गाणे उपलब्ध होईल.

अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, “कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे मैं शेरनी हा म्युझिक व्हिडीओ. शेरनी आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा सिनेमा आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट… यातून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघीण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवू पाहतोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

- Advertisement -

भारत आणि 240 हून अधिक देश आणि प्रांतातील प्राइम सदस्यांना 18 जून पासून फक्त अमेझॉन प्राइम व्हिडीओवर शेरनी स्ट्रीम करता येईल.

- Advertisement -

हे हि वाचा – कंगनाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा? बॉम्बे हायकोर्ट 25 जूनला घेणार निर्णय

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -