घरदेश-विदेशइंधन दरवाढीमुळे इंडिगोचे तिकीट महागणार

इंधन दरवाढीमुळे इंडिगोचे तिकीट महागणार

Subscribe

दररोज होत असलेल्या इंधन दरवाढीचा फटका आता विमान वाहतूक कंपन्यांना सुद्धा बसू लागला आहे. कमी दरात वाहतूक सेवा देणारी एअरलाईन्स म्हणून इंडिगोची ओळख आहे. सतत होणाऱ्या इंधनाच्या दरवाढीमुळे इंडिगोने विमानाच्या तिकीटांमध्ये ४०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

इंडिगोने जाहीर केलेल्या नव्या दरपत्रकानुसार एक हजार किलोमीटर पेक्षा कमी अंतरासाठी २०० रुपयांची तर एक हजार किमीपेक्षा जास्त अंतरासाठी ४०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. इंडिगो देत असलेल्या सेवेवर हा अधिभार ३० मे पासून लागू होणार आहे. कंपनीच्या एकूण खर्चापेक्षा ४० टक्के खर्च हा फक्त विमानाच्या इंधनावर होत आहे.

- Advertisement -

या महिन्यात ‘एटीएफ’ च्या (Aviation turbne fuel) किंमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. विमान सेवेतील दरवाढीचे हे देखील एक कारण असल्याचे मानले जाते. शिवाय अधिभाराचा निर्णय घेण्यामागे भारतीय रुपयाचे होत असलेले अवमूल्यन देखील जबाबदार असल्याचे इंडिगो कंपनीच्या मुख्य व्यावसायिक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मागील दशकात महागाई दराच्या तुलनेत विमानाचे तिकिट दर ५० टक्क्यांनी कमी होते. मात्र यावेळी लागू केलेल्या तिकिट दरांचा विमान सेवेच्या मागणीवर फारसा परिणाम दिसणार नाही, अशी अपेक्षा इंडिगोचे मुख्य व्यावसायिक अधिकारी संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.

सध्या दररोज होत असलेल्या इंधनाच्या दरवाढीमुळे भारतीय नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये इंडिगोने जाहिर केलेले नवे तिकिट दर मध्यम वर्गीयांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -