घरदेश-विदेशBudget 2019: इंदिरा गांधींनंतर सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर

Budget 2019: इंदिरा गांधींनंतर सीतारामन यांनी केला अर्थसंकल्प सादर

Subscribe

२८ फेब्रुवारी १९७० रोजी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता

सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतरचा मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेमध्ये अर्थ संकल्प सादर करत आहे. या बजेटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तब्बल ४९ वर्षानंतर महिला अर्थमंत्री बजेट सादर करत आहेत. ४९ वर्षापूर्वी २८ फेब्रुवारी १९७० मध्ये प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तब्बल ४९ वर्षानंतर एखादी महिला अर्थसंकल्प सादर करणार आहे ही आर्श्चयाची बाब आहे.

४९ वर्षापुर्वी इंदिरा गांधींनी केला होता अर्थसंकल्प सादर

भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत. यापुर्वी २८ फेब्रुवारी १८७० साली म्हणजेच ४९ वर्षापुर्वी केंद्रीय अर्थमंत्री असणाऱ्या इंदिरा गांधी यांनी आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. इंदिरा गांधींनंतर सीतारामन यांना देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला आहे.

- Advertisement -

सीतारामन यांनी प्रथमच केला अर्थसंकल्प सादर

मोदी सरकारच्या पहिल्या पर्वामध्ये संरक्षणमंत्रिपद असणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्यावर या दुसऱ्या पर्वात अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याने देशाला पुर्णवेळ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांना संधी मिळाली आहे. ‘मोदी २.०’ पर्वात अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांनी प्रथमच हा अर्थसंकल्प सादर केला आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्या हातात लाल रंगाच्या ब्रिफकेसऐवजी लाल रंगाच्या कपड्यात हा अर्थसंकल्प दिसला आजपर्यंत चालत आलेल्या प्रथेला बाजूला सारून त्यांनी नवीन पायंडा पाडल्याने संसदेत आणि संसदेच्याबाहेर त्याची जोरदार चर्चेला उधाण आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -