घरअर्थजगतरेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल; PPP मॉडेलमधून ५० लाख कोटी उभारणार

रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल; PPP मॉडेलमधून ५० लाख कोटी उभारणार

Subscribe

केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना त्यात रेल्वेसाठी नवीन काय असणार? याबाबत अनेकांना उत्सुकता असते. रेल्वे हा भारतीय जनमाणसाचा आधारस्तंभ आहे. रेल्वे हा आशियातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम आहे. मात्र आता रेल्वेच्या विकासासाठी खासगी भागीदारीतून गुंतवणूक वाढविण्यार भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे सर्वाद मोठ्या सार्वजनिक उपक्रमाची खासगीकरणाकडे वाटचाल होत असल्याचे दिसत आहे.

रेल्वेमध्ये ५० लाख कोटी रुपये गुंतवणुकीची गरज आहे. यासाठी पीपीपी मॉडेलचा वापर केला जाईल, असे सीतारामन यांनी जाहीर केले. तर मुंबई उपनगरात रेल्वेत स्पेशल गाड्यांसाठी विशेष गुंतवणूक करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

- Advertisement -

राष्ट्रीय परिवहन कार्डची घोषणा

निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय परिवहन कार्डचीही घोषणा केली. रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये या कार्डचा वापर होऊ शकतो. रुपे कार्डच्या मदतीने हे कार्ड वापरता येऊ शकते. रेल्वे आणि बसच्या तिकीटांसाठी या एकाच कार्डचा वापर करता येऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -