घरताज्या घडामोडीOmicron Variant: ४० वर्षांवरील व्यक्तींना दिला जाणार बूस्टर डोस, INSACOGची शिफारस

Omicron Variant: ४० वर्षांवरील व्यक्तींना दिला जाणार बूस्टर डोस, INSACOGची शिफारस

Subscribe

देशात नवा कोरोना व्हेरियंट ओमिक्रॉनची एंट्री झाल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन डोस झालेले लोकं बूस्टर डोसची मागणी करत आहेत. याच अनुषंगाने सीरम इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी डीसीजीआयला कोविशिल्डच्या बूस्टरला मंजूरी देण्याची मागणी केली होती. आता वरिष्ठ भारतीय जिनोम वैज्ञानिकांनी ४० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना कोरोना लसींचे बूस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (INSACOG)ने आठवड्याच्या बुलेटिनमध्ये ही बाब नमूद केली आहे.

INSACOG हे कोरोनाच्या जीनोमिक बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचे नेटवर्क आहे. INSACOG बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, जोखीम नसलेल्या सर्व उर्वरित व्यक्तींचे लसीकरण आणि ४० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बूस्टर डोस विचारात घेतला जाऊ शकतो.

- Advertisement -

दरम्यान देशात ओमिक्रॉनची एंट्री झाल्यामुळे चिंता वाढली आहे. INSACOG म्हणाले की, सर्वात पहिल्यांदा उच्च जोखीम असलेल्या लोकांवर लक्ष्य देण्याचा विचार केला जात आहे. जरी आता असलेल्या लसी ओमिक्रॉनवर परिणामकारक नसल्या तरी यामुळे गंभीर रोगाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एकूण २८ नमुन्यांची जिनोम सिक्वेंसिंग केली जात आहे. यापैकी कस्तुरबा गांधी रुग्णालयात १२ नमुन्यांची तपासणी होत असून १६ नमुन्यांची तपासणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे होत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: राज्यातील २८ जिनोम सिक्वेंसिंग अहवाल प्रतिक्षेत; घाबरून जाऊ नका, टोपेंचे विनंती


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -