घरदेश-विदेश‘Lord Voldemort’ ला केली पोलिसांनी अटक

‘Lord Voldemort’ ला केली पोलिसांनी अटक

Subscribe

harry potter (हॅरी पॉटर) या चित्रपटात नकारात्मक भूमिका करणारे पात्र ‘Lord Voldemort’ (लॉर्ड वोल्डेमॉर्ट) असे नाव ठेवणाऱ्या एका वीमा अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ग्राहकांना जीवेमारण्याची धमकी दिल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हॅरी पॉटर या चित्रपटा नकारात्मक भूमिका साकारणारा लॉर्ड वोल्डेमॉर्ट  ‘Lord Voldemort’ ची भूमिका जगभरात चांगलीच गाजली होती. या भुमिकेसाठी टॉम मारवोलो रेडल या कलाकाराला अनेक पुरस्कार मिळाले होते. या भूमिकेची छाप  लोकांवर अजूनही आहे. याच भूमिकेवरून एका वीमा अधिकाऱ्याने स्वतःच्या नावात बदल करुन घेतला. या नावाने एक इमेल अकाउंट बनवून या अधिकाऱ्याने वीमा पॉलीसी न घेणाऱ्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सिंगापूर येथे घडला आहे. सिंगापूर पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन अखेर या वीमा अधिकाऱ्याला अटक केली आहे. ये लिन मायिंट (३६) असे या वीमा अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्याने लॉर्ड वोल्डेमॉर्टच्या नावावरून अनेकजणांना धमकी दिली आहे. मायिंटला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला २ वर्ष ५ महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काय आहे प्रकार

ये लिन मायिंट हा एका खाजगी वीमा कंपनीत वीमा एजंट म्हणून कार्यरत होता. या कंपनीसाठी वीमा विकण्याचे काम तो करत होता. वीमा घेण्यासाठी तो लोकांना फोन वरून संपर्क साधत असे. अनेकदा लोक त्याला भेटण्यासाठी वेळ देऊन अपॉइंटमेंट रद्द करत असत. या कारणवरून मायिंटला राग येत होता. अखेर त्याने वोल्डेमॉर्ट नावाने एक अकाऊंट उघडले. यातून त्याने अशा लोकांना धमकीचे मेल पाठवण्यास सुरुवात केली. लोकांकडून तो बीट कॉइन्सची मागणी करत होता. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आल्या नंतर पोलिसांनी तपास करुन त्याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -