घरताज्या घडामोडीआर्थिक प्रश्नांवर आंदोलने घडविणाऱ्या पत्रकारास फाशी

आर्थिक प्रश्नांवर आंदोलने घडविणाऱ्या पत्रकारास फाशी

Subscribe

आर्थिक मुद्द्यांवरुन देशव्यापी निदर्शने घडवून आणणाऱ्या एका इराणच्या पत्रकारास फाशी देण्यात आली आहे.

आर्थिक मुद्द्यांवरुन देशव्यापी निदर्शने घडवून आणणाऱ्या एका इराणच्या पत्रकारास फाशी देण्यात आली आहे. रुहोल्ला झॉम, असे आरोपीचे नाव असून शनिवारी सकाळी या पत्रकारास फाशी देण्यात आली. या पत्रकाराने ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून २०१७ मध्ये निदर्शने घडवून देशातील सरकार उलथवण्याचे प्रयत्न केला होता. या आरोपाखाली झॉम आरोपीला फाशी देण्यात आली आहे.

रुहोल्ला झॉम या आरोपीच्या नावावर हेरगिरी करण्याचेही आरोप असल्याचे समोर आले होते. दरम्यान, झॉम यांच्या संकेतस्थळावर आणि टेलिग्राम वाहिनीवर काही संदेश प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे सरकारविरोधी आंदोलनास पाठबळ मिळाले होते.

- Advertisement -

दरम्यान, इराणमधील ईश्वरसत्ताक शिया राजवटीला देखील त्यांनी चळवळीच्या माध्यमातून आव्हान दिले होते. इराणमध्ये २०१७ मध्ये झालेली सरकारविरोधी निदर्शने मोठी आणि व्यापक स्वरूपाची होती. २००९ मधील ग्रीन मूव्हमेंटनंतरचे ते सर्वात मोठे आंदोलन होते. त्यांच्या सामाजिक माध्यमातील संदेशांमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सरकारला पुन्हा आंदोलनाचा सामना करावा लागला होता.


हेही वाचा – दिल्ली-नोएडा सीमा केली खुली; संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -