घरदेश-विदेशअफगाणिस्तान आणि सिरियापेक्षाही भारतीय महिला असुरक्षित!

अफगाणिस्तान आणि सिरियापेक्षाही भारतीय महिला असुरक्षित!

Subscribe

लंडनमधील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत महिला सुरक्षिततेच्या बाबतीत अफगाणिस्तान आणि सिरियापेक्षा मागे आहे. तसेच महिलांना सर्वात हीन वागणुक देणाऱ्या सोमालिया आणि लिबियापेक्षाही भारताची परिस्थिती वाईट असल्याचे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.

भारतात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. विनयभंग, बलात्कार, लैंगिक शोषणासारख्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. कठुआ बलात्कार प्रकरण, निर्भया, कोपर्डी येथे झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी देशाला हादरवून सोडले. त्यामुळे सर्वच स्तरातून भारतातील परिस्थितीवर टिका केली जात आहे. आता काही परदेशी संस्था आणि संघटनादेखील भारतावर टिका करण्याची संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. लंडनमधील एका संस्थेने जगभरातील महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने एक सर्वेक्षण केले. त्यासाठी संस्थेने लंडनमधील ५५० हुन अधिक लोकांशी सवांद साधला. यामध्ये सिरिया आणि अफगाणिस्तानपेक्षाही भारतातील महिला या अधिक असुरक्षित असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणअंती काढण्यात आला आहे.

पहिल्या दहांत अमेरिकेचाही समावेश

लंडनमधील थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशन या संस्थेने हे सर्व्हेक्षण केले आहे. यामध्ये भारत हा महिलांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे. भारतापाठोपाठ अफगाणिस्तान आणि सिरिया या देशांचा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक आहे. त्यापुढे सोमालिया आणि सौदी अरब या देशांचे क्रमांक आहेत. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, भारतात महिलांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केले जाते. तसेच महिलांना गुलाम बनवले जाते. त्यामुळे सर्वेक्षणात भारताचा नंबर दुर्दैवाने वरचा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे असुरक्षित देशांच्या यादीत पहिल्या दहा देशांत केवळ अमेरिका या एकमेव पाश्चिमात्य देशाचा समावेश आहे.

- Advertisement -

सिरियासारख्या देशाशी तुलना नको

एकीकडे काही आखाती देशांमध्ये आजही महिला स्वतंत्र नाहीत. सौदी अरबमध्ये काही दिवसांपुर्वीच महिलांना गाडी चालवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आखाती देशांच्या तुलनेत भारत मागे कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच भारताची तुलना अफगाणिस्तान किंवा सिरियासारख्या देशांशी होऊच शकत नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे.

या सर्वेक्षणावर भारतीयांची टीका

ज्या ५५० लोकांनी या सर्वेक्षणासाठी स्वत:ची मतं नोंदवली आहेत. त्या लोकांना भारताविषयी किती माहिती आहे. त्या लोकांना अफगाणिस्तान, सिरिया, सोमालिया, लिबिया, सौदी अरब, इराण, इराक आणि इतर आखाती देशांमधील परिस्थितीविषयी किती माहिती आहे. लंडनमध्ये राहत असलेले लोक भारतासह आशियाई देशांमधील परिस्थितीवर कसे काय भाष्य करु शकतात? असेही प्रश्न विचारले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -