घरताज्या घडामोडीदिल्लीत आयसीसच्या सक्रिय कार्यकर्त्याला अटक, बाटला हाऊसप्रकरणी एनआयएची कारवाई

दिल्लीत आयसीसच्या सक्रिय कार्यकर्त्याला अटक, बाटला हाऊसप्रकरणी एनआयएची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली –  राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए)अधिकार्‍यांनी दिल्लीतील बाटला हाऊस परिसरातून आयसीसच्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आहे. मोहसीन अहमद असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अहमद क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून इराक, अफगाणिस्तान आणि सीरियातील दहशतवाद्यांना आर्थिक मदत करीत होता. एनआयएच्या पथकाने गेल्या रविवारी 6 राज्यांतील 13 ठिकाणी छापेमारी करीत आयसीस मॉड्यूलचा छडा लावला होता. अटकेनंतर मोहसीनला एनआयए न्यायालयात हजर केले असता मोहसीनला एका दिवसाची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनाआधी एनआयएच्या पथकाने दिल्लीत शोधमोहीम सुरू केली आहे. यावेळी आयसीस मॉड्यूलच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला एक सक्रिय दहशतवादी बाटला हाऊस परिसरात लपून बसल्याची माहिती एनआयएच्या पथकाला मिळाली होती. मोहसीन हा जामियाचा विद्यार्थी असून तो बीटेक करीत आहे. कारवाईदरम्यान मोहसीनकडून एक मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले असून त्यामधून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह साहित्यासोबतच अनेक व्हिडीओही सापडले आहेत, ज्यामध्ये मोहसीन आयसीससाठी देशात प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. देशात खिलाफाह पार्टी ऑफ इंडिया, खिलाफा फ्रंट ऑफ इंडिया, इंटलेक्चुअल स्टुडंट्स ऑफ इंडिया यांसारख्या संघटना स्थापन करूनअलिप्ततेसाठी द्वेष भडकावण्यातही त्याचा सहभाग आहे.

- Advertisement -

दहशतवादी मोहसीनचे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. दहशतवादी मोहसीनने चौकशीदरम्यान सांगितले की, दहशत पसरवणे हा त्याचा हेतू होता. एनआयएच्या चौकशीत मोहसीनने आणखी 2 संशयितांची नावे सांगितली असून त्यांची चौकशी सुरू आहे. या दहशतवाद्यांची चौकशी करण्यासोबतच एनआयएचे पथक क्रिप्टो करन्सीच्या एक्सचेंजकडून रेकॉर्ड मागवणार आहे, ज्यामध्ये परदेशात किती क्रिप्टो करन्सी केव्हा आणि कुठे पाठवल्या गेल्या याबाबत चौकशी केली जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -