घरदेश-विदेशकुलभूषण जाधव प्रकरणात भारताला वकील नेमण्याची संधी; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला वकील नेमण्याची संधी; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

कुलभूषण जाधव प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला धक्का दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी, असं न्यायालयानं गुरूवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

या आधी पाकिस्तानकडून भारतीय वकील नियुक्त करण्यास नकार देण्यात आलेला होता. मात्र, न्यायालयाचे निर्णयाने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, आतापर्यंत कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडघशी पडला आहे.

- Advertisement -

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली अटक केली असून ते सध्या पाकिस्तानी तुरुंगात आहेत. आयसीजेने दिलेल्या निकालानुसार काउंन्सलर अ‍ॅक्सेस तसंच मुक्त आणि निष्पक्ष सुनावणी पूर्व अट असल्याची भारताने पाकिस्तानला आठवण करुन दिली आहे. दरम्यान, याआधी कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचं पाकिस्तानने सांगितलं. यावर भारताने पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -