घरताज्या घडामोडीघ्या आता रियावर चित्रपट, मुंबईत शुटींगलाही झाली सुरूवात!

घ्या आता रियावर चित्रपट, मुंबईत शुटींगलाही झाली सुरूवात!

Subscribe

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली आणि या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. तेव्हापासून रिया अडचणीत देखील वाढ झाली. या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे गेला आहे. सीबीआय़, ईडी आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. न्यूज १८ ने दिलेल्या रिपोर्टनुसार रिया चक्रवर्तीवर आधारीत सिनेमा तयार करण्यात येत आहे. सिनेमाच्या टायटलपासून ते कथेपर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सुशांत प्करणावर देखील चित्रपट बनवण्याची तयारी सुरू होती. या चित्रपटाचे पहिले पोस्टर देखील आले होते. मात्र सुशांतच्या कुटुंबियांनी यावर हरकत घेतली. तसेच सुशांतच्या वकिलांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला. त्यांनी म्हटले होते की, कोणताही निर्माता, दिग्दर्शक सुशांतच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार नाही किंवा पुस्तक लिहू शकणार नाही. असे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

आता रियाच्या आयुष्यावर सिनेमा

आता रियाच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या सिनेमाचं नाव आहे न्याय द जस्टिस. श्रुती मोदीचे वकील अशोक सरोवगी आणि त्यांची पत्नी सरला सरोवगी सुशांत –रिया प्रकरणावर आधारीत सिनेमा तयार करणार आहेत. त्याच्या शुटींगला देखील सुरूवात करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार सिनेमाची स्क्रिप्ट वकील अशोक सरोवगी यांच्या डायरीतून तयार केली आहे. या चित्रपटात टीव्ही अभिनेता झुबेर के खान सुशांतसिंग राजपूतच्या भुमिकेत दिसणार आहे. तर श्रेया शुक्ला रियाच्या भूमिकेत दिसणार आहे. १ सप्टेंबरपासून मुंबईत सिनेमाचं शुटींग सुरू करण्यात आलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – कोण म्हणतं PUBG बॅन झाला; या चोर मार्गाने आताही खेळू शकता PUBG!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -