घरदेश-विदेशजगभरात कोरोनाचं थैमान! इस्रायल देशाकडून कोरोनामुक्त झाल्याची घोषणा

जगभरात कोरोनाचं थैमान! इस्रायल देशाकडून कोरोनामुक्त झाल्याची घोषणा

Subscribe

लसीकरणानंतर इस्रायल देश कोरोनामुक्त

एकीकडे जगभरात कोरोनाचं थैमान सुरू असताना दुसरीकडे इस्रायल असा देश बनला आहे, ज्याने कोरोनाच्या वाढत्या फैलावादरम्यान, इस्रायल कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या मोठ्या लसीकरण मोहिमेनंतर तेथे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले आहे. कोरोनामुक्तीच्या घोषणेनंतर इस्रायलने कोरोनाच्या नियमांमध्ये देखील शिथिलता आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उघडल्या असून सर्व मुलं पुन्हा शाळेत हजर झाली आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास देखील सूट दिली आहे. मात्र मोठ्या सभा, सोहळ्यांमध्ये मास्क घालणं बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

लसीकरणानंतर इस्रायल कोरोनामुक्त

इस्रायल देशाने जगभरात लसीकरण मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या देशातील लोकांना वेगाने लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच तेथे अनेक कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली असून काही निर्बंध हटविले आहेत. यासह इस्रायलने गेल्या आठवड्यात घोषणा केली की, मेपासून परदेशी पर्यटकांनाही देशात प्रवेश देण्यात येईल आणि त्यांचे लसीकरण देखील करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्र्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी कोरोना महामारीला सुरूवात झाल्यानंतर इस्रायलमध्ये कोरोनाच्या ८ लाख ३६ हजार बाधितांची नोंद करण्यात आली होती. तर या महामारीमुळे ६ हजारांहून अधिक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, इस्रायलमधील ९.३ दशलक्ष नागरिकांपैकी ५३ टक्के नागरिकांना फायझर बायोएनटेक या लसीचे डोस देण्यात आले आहे. इस्रायलमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूदरात घट झाल्याचे समोर आले आहे. या दिलासादायक गोष्टीनंतर इस्रायलमध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा स्थिर होण्यासाठी अनेक व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


Covid-19: हाँगकाँगने भारतातून येणार्‍या फ्लाईट्सला ३ मे पर्यंत घातली बंदी

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -