घरदेश-विदेशCorona: ITBP चे ५ जवान कोरोना पॉझिटिव्ह; १०० जवानांना केले क्वारंटाईन

Corona: ITBP चे ५ जवान कोरोना पॉझिटिव्ह; १०० जवानांना केले क्वारंटाईन

Subscribe

दिल्लीच्या शास्त्री पार्क पोलिस स्टेशनमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात दोन आयटीबीपी जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

दिल्लीत तैनात पाच इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 100 जवानांना अलग ठेवण्यात आले आहे. दिल्लीच्या शास्त्री पार्क पोलिस स्टेशनमध्ये कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात दोन आयटीबीपी जवानांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या दोन्ही जवानांना झज्जरच्या एम्समध्ये दाखल केले आहे. यानंतर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या सर्व सैनिकांना अलग ठेवण्यात आले आहे.

तसेच आयटीबीपीच्या खानपूरच्या टिग्री कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये तैनात असलेल्या तीन जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या टिग्री कॅम्पमधील या तीन कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

आयटीबीपीमध्ये ५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण सेना सतर्क झाली आहे. हा साथीचा रोग टाळण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व कोणत्याही प्रकारची शिथिलता घेऊ नये अशा सूचना सैनिक व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान कोरोनाव्हायरस जगात तसेच भारतातही वेगाने वाढत आहे. अहवालानुसार १८० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या या व्हायरसने आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जगभरात ३३ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.


Corona: CRPF च्या अजून १२ जवानांना कोरोनाची लागण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -