घरदेश-विदेशजम्मू काश्मीरवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सर्व जिल्हा पोलिसांना सतर्कतेच्या सूचना

जम्मू काश्मीरवर दहशतवादी हल्ल्याचे सावट, सर्व जिल्हा पोलिसांना सतर्कतेच्या सूचना

Subscribe

जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीच्या घटना घडत आहेत. यात आता जम्मू काश्मीरच्या रामबन, किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या एसएसपींना नाकीबंदी करण्यासह सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. यात बुधवारपासून किश्तवाडमध्ये मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरु आहे. गुरुवारी जम्मू – काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह आज किश्तवाडमध्ये पोहोचले आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली जात आहे. यात हिमाचल प्रदेश आणि काश्मीरला असलेल्या किश्तवाड जिल्ह्यातील अनेक भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

सुरक्षा दलांनी बुधवारी शहरात शोध मोहिम सुरु केली आहे. यात बसस्थानक आणि लगतच्या परिसराची झाडाझडती घेतली जात आहे. येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची झडती घेण्यासह उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी सुरु आहे. दरम्यान बुधवारी रात्री उशीरा काही दहशतवाद्यांनी जम्मू- काश्मीरच्या श्रीनगरमधील आलोचीबाग परिसरात पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य करत गोळीबार केला यानंतर ते पळून गेले. सुदैवाने यात एकाही पोलिसाला दुखापत झालेली नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. काश्मीर विभागाच्या पोलिसांनी ट्विट करत म्हटले की, श्रीनगरच्या आलोचीबाग भागात एका वाहनात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला पोलीस दलाने चोख प्रत्युत्तर दिले आहे, पोलिसांचे प्रत्युत्तर पाहून दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले आहेत.


हेही वाचा : व्हेंटिलेशन नाही, मला गुदमरायला होतंय, राऊतांच्या तक्रारीनंतर कोर्टाचे ईडीला आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -