घरदेश-विदेशयेथे लग्न केल्यास दिले जातात ४.२५ लाख रुपये; जाणून घ्या अटी

येथे लग्न केल्यास दिले जातात ४.२५ लाख रुपये; जाणून घ्या अटी

Subscribe

तुम्हाला लग्न करण्यासाठी कोणी चार लाख रुपये देत असेल तर, मस्करी वाटेल ना. परंतू जगात असा एक देश आहे ज्याचे सरकारच लग्न करण्यासाठी जोडप्यांना तब्बल ४.२५ लाख रुपये देऊ करत आहेत. जपानमध्ये ही योजना राबवली जात आहे. घटता जन्म दर आणि वृद्धांची वाढती लोकसंख्या लोकसंख्या यावर आता जपान सरकारने मात करण्याचे ठरवले आहे. यासाठी लग्न करून संसार थाटण्यास इच्छुक जोडप्यांना जपान सरकारकडून सहा लाख येन म्हणजे जवळपास ४.२५ लाख रुपये देणार आहे. लग्न करून लवकरात लवकर मूल जन्माला यावे आणि घटत्या जन्मदरावर नियंत्रण मिळवता येईल, अशी येथील सरकारला अपेक्षा आहे.

या आहेत सरकारच्या अटी 

जपानच्या सरकारने या योजनेत सहभागी होणाऱ्यांसाठी काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये जोडप्यांचे वय ४० हून अधिक असता कामा नये. त्याशिवाय दोघांचेही एकत्रित उत्पन्न ३८ लाखांहून अधिक असता कामा नये. तसेच ज्या जोडप्यांचे वय ३५ हून कमी असेल त्यांचे उत्पन्न ३३ लाखांहून अधिक असता कामा नये व त्यांना २.११ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी जपानमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात कमी ८ लाख ६५ हजार बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. तर, त्या तुलनेत मृत्यूची संख्या ही पाच लाख १२ हजारांहून अधिक होती. तसेच यंदाच्या वर्षी जन्मदर अधिक असण्याची अपेक्षा सरकारला आहे. मागील वर्षी जपानमध्ये १.४२ इतका जन्मदर होता. यावर्षी मात्र यात वाढ होऊन १.८० इतका असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जपानची लोकसंख्या १२.६८ कोटी इतकी असून वयोमानाप्रमाणे जपान हा जगातील सर्वाधिक वयस्कर लोकसंख्येचा देश आहे.

 हेही वाचा –

Rhea Chakrabory सह ६ आरोपींना ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -