घरक्रीडाICC Meeting: ICC च्या कमिटीत जय शाहांची एन्ट्री; PCB अध्यक्ष रमीझ राजा...

ICC Meeting: ICC च्या कमिटीत जय शाहांची एन्ट्री; PCB अध्यक्ष रमीझ राजा यांना झटका

Subscribe

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) एन्ट्री झाली आहे. जय शाहा यांना आयसीसीमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. जय शाह यांना आयसीसीच्या मेन्स क्रिकेट कमेटीमध्ये मेम्बर बोर्ड प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (ICC) एन्ट्री झाली आहे. जय शाहा यांना आयसीसीमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. जय शाह यांना आयसीसीच्या मेन्स क्रिकेट कमेटीमध्ये मेम्बर बोर्ड प्रतिनिधी (Member Board Representative) म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. रविवारी पार पडलेल्या आयसीसीच्या त्रैमासिक बैठकीत यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. तसंच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांचा चार देशांच्या स्पर्धेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

आयसीसी मेन्स टी २० विश्वचषक २०२४ साठी १२ संघांना थेट प्रवेश दिला जाणार आहे. २०२२ च्या विश्वचषकात पहिल्या आठ संघांना, यजमान देश (वेस्टइंडिज, युएसए) सोडून टी २- रॅकिंगमधील पुढील सर्वोच्च रँक असलेल्या टीम्स सहभागी होती. जर वेस्ट इंडिज पहिल्या आठ क्रमांकांमध्ये असेल, तर रँकिंगच्या आधारावर तीन टीम्स पुढे जातील. उर्वरित आठ स्थानांचा निर्णय रिजनल क्वालिफिकेशन प्रक्रियेच्या माध्यमातून केला जाईल. यामध्ये आफ्रिका, आशिया आणि युरोपमधून दोन दोन टीम्स आणि अमेरिका, ईएपीमधून एक एक टीम सहभागी होईल. याशिवाय आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२४ साठी क्वालिफिकेशन प्रक्रियेवरही सहमती झाली.

- Advertisement -

कोण आहेत सदस्य?

  • महेला जयवर्धने (पुन्हा नियुक्ती)
  • गॅरी स्टीड – राष्ट्रीय टीमचे कोच प्रतिनिधी
  • जय शाह – मेंबर बोर्ड प्रतिनिधी
  • जोएल विल्सन – आयसीसी एलिट पॅनल अम्पायर
  • जेमी कॉक्स – एमसीसी प्रतिनिधी

रमीझ राजांना प्रस्ताव फेटाळला

- Advertisement -

या बैठकीत एका महत्त्वपूर्ण निर्णयात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांचा चार देशांच्या (भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया) स्पर्धेचा प्रस्ताव बोर्डाने एकमताने फेटाळला. यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होण्याची शक्यता संपुष्टात आली.


हेही वाचा – IPL 2022: ‘हा’ खेळाडू CSK चा कर्णधार हवा होता; ‘चेन्नई’च्या पराभवानंतर रवी शास्त्रींचं विधान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -