घरदेश-विदेश'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' बेबी पावडर घातक नाही?

‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ बेबी पावडर घातक नाही?

Subscribe

'जॉन्सन अॅण्ड जॉन्सन' बेबी पावडरमुळे कर्करोग होतो अशी बातमी पसरल्यानंतर पावडरची निर्मिती बंद ठेवण्यात आली होती. चाचणीनंतर पावडरची निर्मिती पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

लहान मुलांसाठी प्रसाधनांची निर्मिती करणारी जगप्रसिद्ध कंपनी ‘जॉन्सन अॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या बेबी पावडरची निर्मिती कंपनीने पुन्हा सुरु केली आहे. भारतामध्ये या पावडरची निर्मिती काही महिन्यांपासून थांबवण्यात आली होती. या पावडरमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे पावडरची निर्मिती बंद करण्याचा निर्णय देण्यात आला होता. या कंपनीला केंद्रीय औषध मानक निंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) दणका दिला होता. कंपनीच्या हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पातून नियंत्रण संस्थेने नमुने गोळा केले होते. कंपनीच्या बेबीपावडरमध्ये कर्करोगासाठी कारणीभूत ठरणारे अंश सापडल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते. त्यामुळे ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

शेअर्सच्या दरात झाली होती घसरण

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने आपल्या बेबी पावडरची निर्मिती सुरु केली आहे. या प्रोडक्टमध्ये आरोग्याला घातक कोणत्याही वस्तू नाहीत असे पत्रक कंपनीने काढले आहेत. बेबी पावडरच्या कच्च्या मालात तसेच विक्रीसाठी बाजारात आलेल्या बेबी पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस असल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या वृत्तानंतर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीच्या शेअर्सच्या दरात घसरण झाली होती. यादाव्यानंतर कंपनीने सर्व आरोप फेटाळले होते. भारताबरोबरच सिंगापूर, थायलँड, सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत आणि इजिप्त या देशांमध्ये पावडरची शुद्धता पुन्हा पुष्टी केली गेली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -