घरताज्या घडामोडीCovid Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून कोविड लशीचं उत्पादन स्थगित, काय आहे...

Covid Vaccine: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडून कोविड लशीचं उत्पादन स्थगित, काय आहे कारण?

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तसेच कोविडच्या नव्या व्हेरियंटने देखील हातपाय पसरायला देखील सुरूवात केलीय. अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने कोविड लसीचं उत्पादन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने एका मोठ्या प्लान्टमध्ये लस उत्पादन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या अखेरीस सुद्धा लसीचं उत्पादन लीडेन या डच शहरात बंद करण्यात आलं होतं. टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीची कंपनीने पुष्टी केलेली नाहीये.

- Advertisement -

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीकडे कोविड लसीचे लाखो डोस तयार आहेत. आम्ही आफ्रिकन युनियन आणि कोवॅक्स सुविधा यांच्यातील आमच्या कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहू, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय. या कंपनीने २०२२ मध्ये कोविड-१९ लसीच्या ३ अब्ज डॉलर ते ३.५ अब्ज डॉलर विक्रीचा अंदाज वर्तवला आहे.

कंपनीच्या ज्या कारखान्यात प्रायोगिक लस निर्मितीचं काम सुरू आहे. त्याच कारखान्यात येत्या काही महिन्यांत पुन्हा एकदा लसीचं उत्पादन सुरू केलं जाईल, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सने दिलीय.

- Advertisement -

हेही वाचा : Covid-19 Positive News: केरळ, कर्नाटक, तामिळनाडूसह इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा कोरोना आलेख घसरला; केंद्रीय आरोग्य मंत्रालय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -