घरदेश-विदेशसोशल मीडियामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव

सोशल मीडियामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर दबाव

Subscribe

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस ए.के. सिक्री यांनी सोशल मीडियामुळे न्यायिक प्रक्रियेवर दबाव येत आहे, तसेच सध्या पेड न्युजचा काळ आहे.

हल्ली सोशल नेटवर्किंग साईटवर छोट्यातली छोटी गोष्ट लगेच पसरते आणि जनता त्याला लगेच प्रतिसाद देते. यामुळेच न्यायिक प्रक्रियेवर दबाव येत आहे, अशी खंत सुप्रीम कोर्टचे न्यायधीश जस्टिस ए.के. सिक्री यांनी व्यक्त केली आहे. ‘लॉएशिया’ संमेलनादरम्यान ते बोलत होते. ते म्हणाले की, एखाद्या प्रकरणावर निर्णय होण्याआधीच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु होते. याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर होत नसला तरीही काही न्यायाधीशांवर मात्र होतो. कारण तोपर्यंत न्यायाधीश हे परिपक्व होतात. त्यांना माहीती आहे की, सोशल मीडियावर कितीही चर्चा रंगल्या तरीही कायद्याच्या आधारावरच निर्णय घेतला जातो. तसेच ते म्हणाले की, याआधी कोणत्याही कोर्टाने त्यामध्ये सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट. एखादा निर्णय न्यायालायाने दिला की त्यावर टीका करणे हे साहजिकच आहे. पण आता न्यायाधीशाने निर्णय दिल्यानंतर त्यांना बदनाम केले जाते. त्याच्याविरोधात अपमानजनक भाष्य केले जाते, याची मात्र खंत वाटते.

सध्या पेड न्यूजचा काळ

न्यायाधीश सिक्री यांनी प्रसार माध्यमांवर टीका करताना म्हटले की, आता पेड न्यूजचा काळ आहे. त्यामुळे एखादे विशिष्ट मत तयार करून ते माध्यमांवर प्रसारित केले जाते. काही तासांतच ती बातमी वाऱ्यासारखी पसरते. तसेच हल्ली सोशल मीडियाचे सर्वच घडामोडीवर बारीक लक्ष असते. हे असंच सुरु राहिले तर व्यक्तीच्या अभिव्यक्ती आणि खासगी जीवनासाठी हे धोकादायक ठरु शकते. याच संमेलनात सॉलिसिटर माधवी गोराडिया दीवान यांनी देखील आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की, सामान्य नागरीक आणि पत्रकार यांच्यामध्ये फरक आहे. न्यायाधीश सिक्री हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत. त्याआधी ते पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -