घरदेश-विदेशन्यायाधीश उदय लळीत यांनी घेतली देशाच्या 49 व्या सरन्यायाधीशपदी शपथ

न्यायाधीश उदय लळीत यांनी घेतली देशाच्या 49 व्या सरन्यायाधीशपदी शपथ

Subscribe

एन.व्ही.रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. त्यामुळे आता न्यायाधीश उदय लळीत हे पुढील तीन महिन्यांपेक्षा कमी काळ सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत.

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीस उदय लळीत यांनी आज भारताच्या 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. उदय लळीत हे सरन्यायाधीस झालेले महाराष्ट्रातील दुसरे सरन्यायाधीस आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी त्यांना आज शपथ दिली आहे. एन.व्ही.रमण्णा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले. त्यामुळे आता न्यायाधीश उदय लळीत हे पुढील तीन महिन्यांपेक्षा कमी काळ सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत. 8 नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत.

न्यायाधीश उदय लळीत यांनी क्राइम लॉमध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते. गुन्हेगारीशी संबंधित अनेक खटल्यामध्ये त्यांनी अशीलांची बाजू प्रवाभीपणे मांडली होती. उदय लळीत यांनी 1983 साली महाराष्ट्र आणि गोवा काउंसिलमध्ये वकील म्हणून कारकिर्दित सुरूवात केली होती. तसेच 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालात वकिली केली. 1986 मध्ये उदय लळीत हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले.

- Advertisement -

आयोध्या-बाबरी खटल्यातून झाले बाजूला
अयोध्या-बाबरी प्रकरणात सुनावणी करण्यासाठी पाच सदस्यीय खंडपीठातून न्यायालय उदय लळीत यांनी स्वतः माघार घेतली. या प्रकरणाशी निगडीत असलेल्या गुन्हेगारी खटल्यात त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या बाजूने खटला लढवला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली होती.

न्यायाधीश उदय लळीत हे मुळचे महाराष्ट्रातील असून त्यांचा जन्म सोलापूरमध्ये झाला होता. सिंधुदुर्ग मधील गिर्ये कोठरवाडी हे त्याचे मूळ गाव आहे. उदय लळीत यांच्या घराण्यात पिढीजात चालत आलेली आहे. त्यांचे आजोबा, वडील, काका देखील सर्वजण वकिली करायचे.


हेही वाचा :सेवानिवृत्तीच्चा दिवशी सरन्यायाधीश रमणांनी मागितली माफी, म्हणाले प्रलंबित खटले हे मोठे आव्हान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -