घरदेश-विदेशकाँग्रेसमध्ये होणार मोठे संघटनात्मक बदल, के. सी वेणूगोपालांचे महासचिव आणि प्रभारींना पत्र

काँग्रेसमध्ये होणार मोठे संघटनात्मक बदल, के. सी वेणूगोपालांचे महासचिव आणि प्रभारींना पत्र

Subscribe

नवी दिल्ली – देशभारातल्या काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार आहेत. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी वेणूगोपाल यांनी महासचिव आणि प्रभारींना पत्र लिहिले आहे. देशभरात बूथ, ब्लॉक आणि जिल्हास्तरावर बदल केले जाणार आहेत. काँग्रेस समित्यांमध्ये पदाधिकारी निवडताना 50 टक्के पदे 50 वर्षा पेक्षा कमी वयाच्या लोकांना दिली जाणार आहेत. राज्यांमधील काँग्रेस प्रभारींनी 30 ऑगस्टपर्यंत यादी पाठवण्याच्या सूचना के. सी. वेणूगोपाल यांनी केल्या आहेत. राज्यांमधील काँग्रेस पक्ष आणि संघटना मजबूत करण्याच्या हेतून हे फेरबदल करण्यात येणार आहेत.

काँग्रेस पक्षाला मरगळ आल्याची टीका सतत्याने होत आहे. तळापर्यंत काँग्रेसचे कार्यक्रम आणि काँग्रेसची भूमिका त्यामुळे पोहोचत नाही.  पक्षात जेष्ठांची संख्या अधिक आहेत. 50 वर्षांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. तरुणांची संख्या अपेक्षेनुसार नाही. यामुळे काँग्रेसची भूमिका प्रभावण्यासाठी वेणूगोपाल यांनी हे पत्र लिहिले आहे.

विविध स्तरावर बदल –
बूथ स्तर, ब्लॉक स्तर त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी लवकरात लवकर निवडावेत. त्याआधी 30 ऑगस्टपर्यंत यासंदर्भातील यादी पाठवावी. यादी तयार करताना पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे मांडणारी व्यक्ती निवडावी, ती 50 वर्षांपेक्षा कमी असावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. यादीतील किमान 50 टक्के नावे 50 वर्षांच्या आतील असावीत, असे या पत्रात म्हटले आहे. सध्या निवडणुकांचे वारे आहे. 2024मध्ये निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी स्थानिक पातळीवरही विविध निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबूत होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आता या निर्णयानंतर होणाऱ्या बदलाचा काँग्रेसला किती फायदा होतो, हे आगामी काळात दिसून येणार आहे.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -