घरदेश-विदेशकाँग्रेसचा चेहरामोहरा बदलणार? कमलनाथ यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची शक्यता

काँग्रेसचा चेहरामोहरा बदलणार? कमलनाथ यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याची शक्यता

Subscribe

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी देखील उपस्थित होत्या. या बैठकीनंतर कमलनाथ यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या दोन वर्षांपासून पक्षाचा पूर्ण वेळ अध्यक्षाचा शोध संपलेला नाही आहे. सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं, पण त्या प्रकृतीच्या कारणास्तव सक्रीय नाही आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षातून सातत्याने मागणी होत आहे की, अध्यक्ष लवकरात लवकर नेमला जावा. त्या पार्श्वभूमीवर आजची कमलनाथ यांची बैठक महत्त्वाची आहे. दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक लवकरच बोलवली जाणार असल्याची अशी माहिती मिळतेय.

- Advertisement -

कमलनाथ यांचा पक्षात चांगला सहभाग असून ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. २००२ मध्ये त्यांना काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले. बर्‍याच काळापासून गांधी घराण्याशी जवळचे संबंध असलेले कमलाथ हेही राहुल गांधींच्या आवडत्या नेत्यांमध्ये मानले जातात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून ९ वेळा लोकसभेचे खासदार बनलेल्या कमलनाथ यांना २०१८ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री केलं गेलं होतं. तथापि, ज्योतिरादित्य शिंदेंच्या बंडखोरीनंतर, कमलनाथ यांचं सरकार मार्च २०२० मध्ये पडलं आणि पुन्हा एकदा भाजपने सत्ता मिळविली.

कमलनाथ यांच्याकडे सुत्रे सोपवून सोनिया गांधी एका दगडात दोन पक्षी मारणार?

२०१९ पासून काँग्रेस पक्षाचा एक गट राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी करत आहे, पण राहुल स्वत: तयार नाहीत. आरोग्याच्या कारणास्तव सोनिया गांधी पक्षात फारशा सक्रिय नाहीत. दरम्यान, पक्षातील सुमारे दोन डझन नेते आता संघटना निवडणुकांची उघडपणे मागणी करत आहेत. बऱ्याच जणांनी अप्रत्यक्षपणे असंही म्हटलं आहे की पक्षाची सुत्रे गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे जायला हवीत. अशा परिस्थितीत कमलनाथ यांना अध्यक्ष करून सोनिया गांधी एका दगडात दोन पक्षी मारु शकतात. कमलनाथ हे गांधी घराण्याशी खूप निष्ठावान आहेत आणि त्यामुळे अप्रत्यक्षपणे पक्षावरील पकड कमकुवत होणार नाही, दुसरीकडे काँग्रेसवर फक्त एका कुटुंबाचा ताबा आहे अशी टीका करणाऱ्या भाजपसह इतर काही नाराज काँग्रेस नेत्यांना देखील उत्तर मिळेल.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -