घरदेश-विदेशLockDown दरम्यान डिलीव्हरी बॉय बनून विकायला निघाले साप!

LockDown दरम्यान डिलीव्हरी बॉय बनून विकायला निघाले साप!

Subscribe

डिलीव्हरी बॉयच्या वेशात दोन तोंड असणारा साप विकण्याचा केला प्रयत्न

कोरोना व्हायरसमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये सरकारने काही लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. या लोकांमध्ये सरकारी अधिकारी आणि डिलीव्हरी बॉय यांना सूट दिली असून घरपोच आवश्यक वस्तू लोकांना मिळाव्यात यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. परंतु काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमधील सेंट्रल क्राइम ब्राँचने या दोनही डिलिव्हरी बॉयला पकडले आहे. हे दोघेही डिलीव्हरी बॉयच्या वेशात दोन तोंड असणारा साप विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांचा हा प्रकार यशस्वी न ठरता उघडकीस आला आहे.

- Advertisement -

बंगळुरूच्या केंद्रीय गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना अटक केली. ते दोघे डिलीव्हरी बॉय बनून हा साप विकण्याचा प्रयत्न करत होते. लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन डिलीव्हरी सर्विसचे कर्मचारी म्हणून ते दोघे घराबाहेर पडले होते. परंतु, कागलीपुरा परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा देशात केल्याने संपुर्ण कुटुंब सध्या एकत्र घरी राहत आहेत. घरातील सगळे माणसं एकत्र असल्याने घरी पार्सल पदार्थ मागवले जात आहे. मात्र अशी अचानक धक्कादायक बातमी समोर आल्याने ऑनलाईन फूड ऑर्डर करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

Lockdown – मुस्लिम डिलिव्हरी बॉय असल्यामुळे कुटुंबाने नाकारलं सामान!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -