घरदेश-विदेश'काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा मला शिवीगाळ केली; त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांनाही...

‘काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा मला शिवीगाळ केली; त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकरांनाही सोडले नव्हते’

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार वाक्-युद्ध सुरु झाले आहे. काँग्रेसकडून मोदींना विषारी साप तर भाजपकडून सोनिया गांधींना विषकन्या म्हटले गेले आहे. यावरुनच मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.

Karnataka Election 2023 बिदर (कर्नाटक) – काँग्रेसने पुन्हा एकदा माझ्या बद्दल अपशब्द बोलण्यास सुरुवात केली आहे. माझ्यासाठी त्यांचे द्वेषपूर्ण वक्तव्य पुन्हा समोर यायला लागले आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९१ वेळा अपशब्दांचा वापर केला आहे. काँग्रेस माझ्यावर जेवढी चिखलफेक करेल तेवढेच अधिक ‘कमळ’ फुलणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) म्हटले आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील विधानसभा निवडणूक प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसच्या अपशब्दांना मी उपहार म्हणून स्वीकारतो असे म्हटले आहे. बिदर हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा जिल्हा आहे.  (Congress has abused me 91 times)

‘काँग्रेसकडून ९१ वेळा शिवीगाळ’

- Advertisement -

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार वाक्-युद्ध सुरु झाले आहे. काँग्रेसकडून मोदींना विषारी साप तर भाजपकडून सोनिया गांधींना (Sonia Gandhi) विषकन्या म्हटले गेले आहे. यावरुनच मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला. मोदी म्हणाले, आतापर्यंत ९१ वेळा काँग्रेसकडून मला शिवीगाळ झाली आहे. माझ्यावर एवढ्यावेळ बोलण्यापेक्षा काँग्रेसने हिच ताकत गुड गव्हर्नन्सवर खर्च केली असती, काँग्रेस कार्यकर्त्यांवर खर्च केली असती तर, आज काँग्रेसची जी स्थिती झाली आहे, ती झाली नसती, असा टोला मोदींनी लगावला.

ते म्हणाले, ‘जे गरीबांसाठी काम करतात, देशासाठी काम करतात त्यांना शिवीगाळ करण्याची काँग्रेसची पूर्वीपासूनची सवय आहे. हाच काँग्रेसचा इतिहास आहे. मी काही एकटा नाही, ज्याच्यावर अशा प्रकारे त्यांच्याकडून हल्ला होत आहे. मागील निवडणुकीत चौकीदार चोर है म्हटले गेले. नंतर मोदी चोर आहे, म्हणायला लागले आणि मग संपूर्ण ओबीसी समाजच चोर असल्याचं काँग्रेसने म्हटलं. आता त्यांनी लिंगायत समाजाला चोर म्हटलं आहे.’ मोदींनी लिंगायत आणि ओबीसींचा उल्लेख करुन काँग्रेसला इशारा देताना म्हटले आहे, की काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे, तुम्ही आतापर्यंत ज्यांना-ज्यांना शिवीगाळ केली आहे, त्यांनी तुम्हाला असे प्रत्युत्तर दिले आहे की काँग्रेस पुन्हा उभी राहू शकलेली नाही.

- Advertisement -

…त्यांनी बाबासाहेब – सावरकरांनाही सोडले नाही 

मोदी म्हणाले, मला काँग्रेसचे लोक शिवीगाळ करतात, तेव्हा मी विचार करतो, की हे फक्त मला एकट्यालाच शिव्या देतात का? तर नाही. मला शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे टॉपमोस्ट नेते असतात. कोणी छोटे-मोठे काँग्रेसी हे करत नाही, असे म्हणत मोदींनी खरगेंचा नामोल्लेख टाळून त्यांना टोला लगावला आहे.

मोदी म्हणाले, काँग्रेसने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही (Dr. Babasaheb Ambedkar) सोडले नव्हते. बाबासाहेबांनाही त्यांनी वारंवार अपमानित केले. बाबासाहेबांनाही काँग्रेसच्या नेत्यांकडून त्याकाळात शिवीगाळ केली जात होती. यावर एकदा बाबासाहेबांनीही सार्वजनिकरित्या म्हटलं होतं, की काँग्रेसकडून मला वारंवार शिवीगाळ केली जाते. काँग्रेसने बाबासाहेबांना काय-काय नाही म्हणाले, ते बाबासाहेबांना राक्षस, राष्ट्रद्रोही, दगाबाज दोस्त असं म्हणत होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्याकाळात काँग्रेसने बाबासाहेबांसारख्या महापुरुषाला अशा शब्दांनी अपमानीत केले होते. आजही काँग्रेस वीर सावरकरांना शिव्या देत असते. काँग्रेसने अनेक महापुरुषांना अपमानीत केले आहे. हे सर्व पाहातो तेव्हा मला वाटते, की काँग्रेस मलाही त्या महान विभूतींप्रमाणेच सन्मानीत करत आहे. ज्या प्रमाणे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अपमानीत केले, वीर सावरकरांचा (Veer Sawarkar) अपमान केला, तशीच शिवीगाळ ते मोदीला करत आहेत. जर ते बाबासाहेब आणि सावरकरांप्रमाणे मला शिवीगाळ करत असतील तर मी हा माझा सन्मान समजतो.

…कमळ तेवढे अधिक फुलणार
काँग्रेस शिवीगाळ करण्यात वेळा वाया घालवत राहील आणि मी जनता जनार्दनाची सेवा करण्यात स्वतःला झोकून देईल. दिवसरात्र काम करत राहिल. उपस्थित जनसमुदायाला उद्देशून मोदी म्हणाले, तुमच्या आशीर्वादाने सर्व शिव्या मातीत मिसळून जातील. काँग्रेसवाल्यांनी लिहून ठेवावे तुम्ही जेवढा चिखल उडवाल कमळ तेवढे अधिक फुलणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -