घरदेश-विदेशबापरे! कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी अन् मृतदेहात आला जीव

बापरे! कुटुंबियांकडून अंत्यसंस्काराची तयारी अन् मृतदेहात आला जीव

Subscribe

कर्नाटकात रस्ते अपघातात एका २७ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात या व्यक्तीला ब्रेन डेड म्हणून मृत घोषित करण्यात आलं

कर्नाटकातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीला मृत घोषित केल्यानंतर त्या व्यक्तीला पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भयंकर म्हणजे पोस्टमार्टमला ठेवले असता त्या व्यक्तीच्या शरीराच्या हालचाली जाणवू लागल्या. या प्रकारानंतर या व्यक्तीला पुढील उपचारांसाठी त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

कर्नाटकात रस्ते अपघातात एका २७ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघात झाला. या अपघातात या व्यक्तीला ब्रेन डेड म्हणून मृत घोषित करण्यात आलं. या व्यक्तीचे नाव शंकर गोम्बी असून तो बेलगावी येथे राहण्यास होता. या अपघातानंतर त्याला महालिंगपूर येथील शासकीय रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी दाखल करण्यात आलं मात्र दोन दिवसांच्या निरीक्षणानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृतदेह बागलकोट येथील महालिंगपूरच्या शासकीय रूग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. या व्यक्तीचे पोस्टमार्टम सोमवारी होणार होतं. त्यामुळे सोमवारी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी देखील केली होती मात्र घडलेल्या प्रकारामुळे सर्वच थक्क झाले आहेत.

- Advertisement -

या घटनेत डॉ. एस. एस. गलगली या वक्तीचे पोस्टमॉर्टम करणार होते. मात्र या मृत व्यक्तीमध्ये अचानक जीव आला आणि ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याने डॉक्टरही हैरान झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी रुग्णालयात शंकरला व्हेंटिलेटरवरुन काढून टाकल्यानंतर श्वासोश्वास प्रक्रिया बंद झाली होती, त्यामुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली होती.

मात्र, शंकर गोम्बीचे पोस्टमार्टम सुरू असताना ते हैरान झाले. डॉ. गलगली हे शंकरचे पोस्टमार्टम करणार होते. मात्र पोस्टमार्टम दरम्यान शरिरात हालचाली जाणवल्या. याप्रकारानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके तपासले असता. तो जीवंत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी डॉक्टरांनी त्वरीत कुटुंबियांना बोलवत घडलेला प्रकार सांगितला आणि त्याला दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -