घरदेश-विदेशबंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले

बंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले

Subscribe

कर्नाटकमधील राजकीय नाट्याला दररोज वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. आता तर बंडखोर आमदारांमध्येही फूट पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय नाट्य कोणत्या पातळीवर जाईल, याची कल्पनाही करता येणार नाही.

राजीनामे दिलेले कर्नाटकचे १३ बंडखोर आमदार मंगळवारपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. पवईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये ते तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. सुरक्षे संदर्भात मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनामुळे पोलिसांनी हॉटेलच्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. मात्र, या सर्व घडामोडींनंतर बंडखोर आमदारांमध्येही फूट पडल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच कॉंग्रेसचे आमदार एस. टी. सोमशेखर मध्यरात्री बंगळुरुला रवाना झाले आहेत. कर्नाटक येथे पोहोचल्यावर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी आपण राजीनामा दिला असला तरी काँग्रेसमध्येच राहू, असे म्हटले आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकच्या राजकीय नाट्याला दररोज वेगवेगळे वळण लागताना दिसत आहे. शनिवारी काँग्रेसच्या १० तर जेडीएसच्या ३ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप आल्याचे म्हटले जात आहे. यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपली मनधरणी करू नये, यासाठी ते मुंबईत दाखल झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईच्या रेनिसन्स हॉटेल येथे मुक्कामाला आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवकुमार आपली मनधरणी करण्यासाठी येतील, अशी भीती या बंडखोर आमदारांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तची मागणी केली. मुंबई पोलीस आयुक्तांनी हॉटेलच्या चारही बाजूने कडक पोलीस बंदोबस्त केला. याचा फायदा आमदारांना झाला. बुधवारी शिवकुमार आमदारांची मनधरणीसाठी हॉटेलच्या गेटवर आले तेव्हा मोठा गदारोळ झाला. ‘शिवकुमार गो बॅक’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. परिणामी, पोलिसांनी शिवकुमार यांना ताब्यात घेतले आणि थोड्या वेळाने सोडून दिले. त्यामुळे शिवकुमार आणि आमदारांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान, बंडखोर आमदारांमध्येही मतभेद असल्याची बाब समोर आली आहे. त्यातूनच सोमशेखर बंगळुरूला परतले असून आपण काँग्रेसमध्येच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – कर्नाटक : विधानसभा अध्यक्षांविरुद्ध बंडखोर आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -