घरताज्या घडामोडीKCR, अखिलेश आणि केजरीवाल येणार एकाच मंचावर; दक्षिणेत चौथी आघाडी?

KCR, अखिलेश आणि केजरीवाल येणार एकाच मंचावर; दक्षिणेत चौथी आघाडी?

Subscribe

भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी बुधवारी तेलंगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती केल्यानंतरची ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी बुधवारी तेलंगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती केल्यानंतरची ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे ही सभा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे या सभेमुळे दक्षिणेत चौथ्या आघाडीचे बिगुल वाजवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या सभेला विविध राज्यातील मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार आहेत. (KCR Akhilesh yadav and arvind Kejriwal will come on the same stage fourth front in south)

बुधवारी तेलंगणामध्ये होणाऱ्या जाहीर सभेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann), केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinrai Vijayan), समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे केडी राजा (KD Raja) यांचा सहभागी होणार आहेत.

- Advertisement -

या सभेत विविध विरोधी भारत राष्ट्र समिती (BRS), आम आदमी पार्टी (AAP), समाजवादी पार्टी (SP) आणि डाव्या पक्षांचे नेते एकत्र दिसणार आहेत. याला चौथी आघाडी म्हणण्यामागे एक खास कारण आहे. पहिली आघाडी म्हणून भाजपकडे पाहिले जाते. दुसरी आघाडी म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. तिसरी आघाडी म्हणून नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जात आहे. या तिन्ही आघाडींपासून अंतर ठेवून केसीआर चौथी आघाडी स्थापन करण्याचे संकेत देत आहेत.

बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि इतर नेते बुधवारी खम्ममला रवाना होण्यापूर्वी हैदराबादजवळील यदाद्री येथील भगवान लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला भेट देतील. या मंदिराचा नुकताच सरकारने मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जो संकल्प करतो तोच इतिहास घडवतो, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांनी दिला कानमंत्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -