घरदेश-विदेशलॉकडाऊनदरम्यान केदारनाथ मंदिराची उघडली दारं, मात्र भक्तांना प्रवेश बंद!

लॉकडाऊनदरम्यान केदारनाथ मंदिराची उघडली दारं, मात्र भक्तांना प्रवेश बंद!

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना सध्या मंदिर परिसरात जाण्याची परवानगी नाही.

केदारनाथ येथील भगवान केदारनाथ मंदिराची दारं बुधवारी सकाळी 6.10 वाजता मंत्रोच्चार आणि पूजाविधीसह प्रार्थना करण्यासाठी उघडण्यात आली. मात्र कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना सध्या मंदिर परिसरात जाण्याची परवानगी नाही. असे पहिल्यांदाच झाले असावे की, भगवान केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले मात्र मंदिर परिसरात भाविकांची गर्दी नव्हती तर केवळ 15 ते 16 लोकंच मंदिरात उपस्थित होते.

- Advertisement -

सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करून झाली पूजा

कोरोना संकट असताना मंदिरातील पूजेच्या वेळी सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करून सर्व पूजा-विधी करण्यात आले. मंदिरात भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने यात्रेकरूंना मंदिरात जाण्यास बंदी केली आहे. पर्यटन-धर्म सचिव दिलीप जावळकर यांनी केदारनाथ यात्रेसंबंधित व्यवस्थेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, जेणेकरुन कोरोना महामारी संपल्यानंतर चारधाम यात्रा राज्यात पुन्हा सुरळीत सुरू करता येईल.

10 क्विंटल फुलांनी सजावट केलेले मंदिर

केदारनाथ येथे वुड स्टोन कंपनीने बर्फ बाजूला करून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता तयार केले. केदारनाथमध्ये मंदिर परिसराभोवती अजूनही 4 ते 6 फूट इतका बर्फ आहे. मंदिराची दारं उघडण्याच्या वेळी ऋषिकेशच्या बाबांचे भक्त सतीश कालरा यांनी केदारनाथ मंदिरात 10 क्विंटल झेंडू, गुलाबाची फुले व इतर फुले पाठवून मंदिराची सजावट केली.

- Advertisement -

15 मे रोजी उघडणार बद्रीनाथचे दरवाजे

केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच उत्तराखंडमधील चारपैकी तीन धामची कवाडं उघडले आहेत. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने श्री गंगोत्री-यमुनोत्री धामची कवाडं 26 एप्रिलला उघडले आहेत, तर श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे 15 मे रोजी उघडणार असल्याचे सांगितले जात आहे.


अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे; २३ जूनपासून यात्रा सुरू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -