घरदेश-विदेशLockdown: केरळ सरकारने निर्णय बदलला, शिथिल केलेले नियम पुन्हा केले लागू

Lockdown: केरळ सरकारने निर्णय बदलला, शिथिल केलेले नियम पुन्हा केले लागू

Subscribe

शिथिल केलेल्या नियमांना केंद्र सकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुसार या नियमात केले बदल

देशभरात कहर माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेल्या १४ पैकी ७ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध सोमवारपासून शिथिल करण्यात आले होते. यामध्ये केरळच्या सरकारने बसची वाहतुक, रेस्टॉरंट्स, हॉटेल उघडण्यासह रस्त्यावर गाड्या चालवण्यास परवानगी दिली होती. यासह लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या मात्र तसे झाले नाही. शिथिल केलेल्या नियमांना केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर केरळ सरकारने केंद्राच्या मार्गदर्शिकेनुसार या नियमात बदल केले आहेत.

राज्यांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे

यासंदर्भात केरळमधील शहरी भागात लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच बस आणि रेस्टॉरंट्स चालविण्याबाबत राज्य सरकारने कडक आक्षेप घेत केंद्र सरकारने केरळ सरकारला एक पत्र लिहिले. राज्य सरकारचा हा निर्णय लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या विरुद्ध असल्याचेही त्यात म्हटले आहे.

- Advertisement -

यापुंर्वी केलेल्या नियमाने शिथिलीकरण लागू होताच केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याने केलेले नियम हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शिकेच्या बाबतीत उल्लंघन करणारे आहे, असा आक्षेप घेत शिथिलीकरणाच्या जास्तीच्या बाबी रद्द करण्यात याव्यात, असे सुचविले आहे. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने कोरोना व्हायरस अधिक झपाट्याने वाढू शकतो. केंद्रीय गृह मंत्रालय देशातील लॉकडाऊनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र राज्य सरकारच्या या प्रयत्नात सातत्य राखण्यासाठी आम्ही काही पावले उचलत आहोत. एमएचएकडून लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे.

नियम शिथिल होताच रस्त्यावर गर्दी

कोरोना संसर्गामुळे केरळ सरकारने रविवारी देशव्यापी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले. तर केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. नियम शिथिल करताच केरळमध्ये मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येऊ लागले. राज्याच्या विविध भागात विनाकारण गाड्या घेऊन फिरताना दिसले. यामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट घोषित केलेले क्षेत्र देखील समाविष्ट आहेत. मात्र केरळचे मुख्यमंत्री पिनराज विजयन यांनी असे देखील सांगितले की, काही भागांमध्ये निर्बंध शिथिल केले असले तरी कोरोनाचा धोका पुर्णपणे टळलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून सावध राहण्याची आवश्यकता आहे.


Lockdown: नियम शिथिल होताच मुंबईच्या वेशीवर लोकांची गर्दी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -