घरदेश-विदेश‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम, केरळ न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम, केरळ न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Subscribe

कोची : केरळ उच्च न्यायालयाने युवा पिढीच्या वैवाहिक संबंधांबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ‘यूज अँड थ्रो’ या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम झालेला दिसतो. लिव्ह-इन-रिलेशनशिप वाढत आहेत. वेगळे व्हायचे असेल तेव्हा फक्त गुडबाय म्हणायचे, असे मत न्यायालयाने नोंदवले.

- Advertisement -

एका दाम्पत्याचा घटस्फोट नाकारताना केरळ उच्च न्यायालयाने, तरुण पिढी वैवाहिक संबंधांकडे गांभीर्याने नव्हे तर, स्वार्थीपणाने पाहत असल्याबद्दल खेद व्यक्त केला. विवाहबाह्य संबंधांमुळे जे काडीमोड होत आहेत, ते कदाचित वाढत्या ग्राहक संस्कृतीच्या प्रभावामुळे असेल आणि त्यातूनच लिव्ह-इन-रिलेशनशिपचे प्रकार वाढत असावेत, असे मत न्यायमूर्ती ए मोहम्मद मुश्ताक आणि न्यायमूर्ती सॉफी थॉमस यांच्या खंडपीठाने नोंदविले.

लग्न ही एक वाईट प्रथा असून कोणतेही दायित्व किंवा जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जीवन जगण्यासाठी ती टाळली जाऊ शकते, असे आजकालच्या तरुण पिढीला वाटते. पूर्वी ‘वाइफ’ या शब्दाची फोड ‘वाइज इन्व्हेस्टमेन्ट फॉर एव्हर’ (Wise Investment For Ever) अशी केली जात होती. पण आता ‘वरी इन्व्हायटेड फॉर एव्हर’ अशी केली जाते, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली. ‘वापरा आणि फेका’ (use and throw) या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम झालेला दिसतो. लिव्ह-इन-रिलेशनशिप वाढत आहेत, वेगळे होताना केवळ गुडबाय म्हणायचे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

वैवाहिक नातेसंबंध नष्ट झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होईल, असे सांगत न्यायालय म्हणाले की, देवभूमी म्हणून ओळखले जाणारे केरळ हे एकेकाळी कौटुंबिक बंधनासाठी प्रसिद्ध होते. परंतु सध्याचा ट्रेंड मात्र, क्षुल्लक किंवा स्वार्थी कारणांमुळे किंवा विवाहबाह्य संबंधांमुळे विवाहबंधने तोडण्याचा दिसत आहे. त्यासाठी मुलांबाबतही बेफिकीरी दाखवली जाते. अशांत आणि उद्ध्वस्त कुटुंबांतून निघणारा हा आक्रोश समाजाच्या विवेकीपणाला हादरवणारा असतो. भांडखोर दाम्पत्य, एकाकी पडलेली मुले आणि हताश घटस्फोटीत यांचे प्रमाण वाढले तर, सामाजिक जीवनातील आपल्या शांततेवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या समाजाची वाढ खुंटेल, यात शंका नाही, असे मतही खंडपीठाने नोंदविले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -