घर देश-विदेश जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; लान्स नायक शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; लान्स नायक शहीद

Subscribe

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत असताना अँटोनी सेबास्टअन के एम हे शहीद झाले तर एक जवान गंभीर जखमी झाला. लान्स नायक अँटोनी सेबास्टअन के एम हे ३४ वर्षाचे होते. केरळमधील मनाकुन्नम येथील ते रहिवासी होते.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये पाकिस्तानकडून खुरापती सुरुच आहे. दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. आज पहाटे कृष्णाघाटी सेक्टरमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र दहशतवाद्यांशी लढताना लान्स नायक अँटोनी सेबास्टअन के एम शहीद झाले.

एक जवान शहीद तर एक जखमी

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या मेंधर तहसील जवळील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर देत असताना अँटोनी सेबास्टअन के एम हे शहीद झाले तर एक जवान गंभीर जखमी झाला. लान्स नायक अँटोनी सेबास्टअन के एम हे ३४ वर्षाचे होते. केरळमधील मनाकुन्नम येथील ते रहिवासी होते. त्याच्या पाश्चात त्यांची पत्नी आहे. जखमी जवानाला पुंछ येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सुंदरबनी भागामध्ये पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना दोन जवान जखमी झाले.

महाराष्ट्रचा जवान शहीद

पाक सैनिकांच्या गोळीबारात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. केशव सोमगिर गोसावी असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. केशव गोसावी हे नाशिकच्या श्रीरामपुर गावातील रहिवासी होते. जम्मू काश्मीरमधील नौसेरा सेक्टरमध्ये रविवारी पाक सैनिकांनी गोळीबार केला. या गोळीबारात केशव गोसावी जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी तातडीने मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -