घरट्रेंडिंग'लष्कर-ए-तोयबा'च्या बेडुक उड्या! भारताला दिला इशारा

‘लष्कर-ए-तोयबा’च्या बेडुक उड्या! भारताला दिला इशारा

Subscribe

'लष्कर-ए-तौयबा' या दहशतवादी संघटनेने ऑनलाईन मॅगझिन लॉन्च केलं आहे. या मॅगझिनद्वारे त्यांनी 'काश्मीरमधल्या भारतीय जवानांसाठी २०१८ हे वर्ष कठीण असल्याचा', इशारा दिला आहे.

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तौयबा नेहमीच काही ना कारणाने चर्चेत असते. सध्या आपल्या नव्या खुरापतीमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. लष्कर-ए-तौयबाने आपलं ऑनलाईन लाँच केलेल्या मॅगझिनद्वारे काश्मीरच्या भारतीय जवानांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘काश्मीरमध्ये असलेल्या भारतीय जवानांसाठी हे वर्ष कठीण आहे’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. २०१८ हे वर्ष भारतीय जवानांसाठी आव्हानात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मॅगझिनच्या प्रवक्त्याकडून धमकी?

ऑनलाईन उपलब्ध असेलल्या या मासिकाचे प्रवक्ते अब्दुल्ला गजनवी यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, मॅगझिनद्वारे उघड उघड असं वक्तव्य करणं हे एकप्रकारे धमकी देण्याचा प्रकार असल्याची, सगळीकडे चर्चा आहे. ‘आम्ही काश्मीरमधील सामान्य माणून आणि काश्मीरमधला संघर्ष यांचं समर्थन करतो’, असं गजवानी यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलं आहे. ‘काश्मीरचं समर्थन करणं हे पाकिस्तानचं नैतिक कर्तव्य आहे’ असंही गजवानी यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

- Advertisement -

लष्कर-ए-तौयबाचं हे मॅगझिन केवळ ऑनलाईन उपलब्ध असून ते इंग्रजी भाषेत आहे. सध्या काश्मीरमध्ये भारतीय सेनेकडून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआउट’ राबवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तौयबाने हे वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -