घरताज्या घडामोडीकर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटी किंमतीच्या मद्याची विक्री

कर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटी किंमतीच्या मद्याची विक्री

Subscribe

कर्नाटकात पहिल्याच दिवशी ४५ कोटी किंमतीच्या मद्याची विक्री झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ४ मेपासून लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र, या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील मद्यविक्रीला परवनगी देण्यात आली. दरम्यान, पहिल्याच दिवशी देशभरात मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर गर्दी केली होती आणि याचाच परिणाम कर्नाटकात पाहिला मिळाला. कर्नाटकात पहिल्याच दिवशी तब्बल ४५ कोटी रुपयांची मद्विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

४५ कोटींची विक्री

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कॅन्टोनमेंट झोन सोडून इतर तिन्ही झोनमध्ये सशर्त सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सरकारने मद्य विक्रीला देखील परवानगी दिली. तब्बल दीड महिन्यानंतर मद्य विक्री सुरु झाल्याने तळीरामांनी लांबच्या लांब रांगा लावत मद्यविक्रीच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पहिल्याच दिवशी कर्नाटकमध्ये ४५ कोटी रुपयांची ही मद्यविक्री झाली असल्याची माहिती कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी दुकानदारांनी ठराविक अंतरावर गोल रिंगण आखल्याचं पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तर काही ठिकाणी मद्यविक्री सुरु न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक मद्यप्रेमींना रिकाम्या हाताने घरी जावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत १ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो; ट्रम्प यांचा दावा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -