घरदेश-विदेशजगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर, भारत कितव्या स्थानी?

जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर, भारत कितव्या स्थानी?

Subscribe

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे काय

जगभरात २०२१ मध्ये कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे. याबाबतचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशांची नावे आहेत. कोणाकडेही शक्तिशाली पासपोर्ट असल्यास त्याला अनेक फायदे होतात. नुकतेच हेनले ॲन्ड पार्टनर्स (Henley and Partners) ने सादर केलेल्या अहवालानुसार जगभरात जपानचा पासपोर्ट सर्वात जास्त बलशाली असल्याचे समोर आले आहे. सर्वात शक्तिशाली म्हटले की आपण अमेरिकेचे नाव घेतो परंतु अमेरिका सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. तर भारत पासपोर्टच्या यादीत ८५व्या स्थानावर आहे. तसेच पाकिस्तान या यादीत खालून चौथ्या स्थानावर आहे. चीन सर्वात शक्तिशाली यादीत ७०व्या स्थानावर आहे.

सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणजे काय

परदेशात जाणे ही सर्वात महत्त्वाची असली तरी कोणत्या देशाचा पासपोर्ट किती शक्तिशाली आहे. हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. पासपोर्ट धारक व्हिसा घेतल्याशिवाय किती देशात प्रवास करु शकतो यावर अवलंबून आहे. या प्रकरणात जपानने पहिला क्रमांक पटकविला आहे. कोणत्याही देशासाठी एक शक्तिशाली पासपोर्ट रँकिंग महत्त्वपूर्ण आहे कारण त्या देशातील किती नागरिक जगात व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात यावरच निर्णय घेतला जातो. म्हणजेच, या सुविधेअंतर्गत, इतर देशांमध्ये शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशातील नागरिकांना आगमनाची सुविधा उपलब्ध आहे. ही रँकिंग आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघटनेच्या डेटावर आधारित आहे.

- Advertisement -

भारत कितव्या स्थानी?

हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचा पासपोर्ट ८५ व्या क्रमांकावर आहे. जगातील ५८ देश भारतीय पासपोर्ट धारकांना कोणत्याही पूर्व व्हिसाशिवाय प्रवेश करू देतात. या ठिकाणी भारतासह तजाकिस्तान आहे. सन २०२० मध्ये भारताचे स्थान ८४ होते. तरीही जगातील ५८ देशांमध्ये भारतीय नागरिकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यात येत असे.

- Advertisement -

सर्वात शक्तिशाली पासपोर्टमधील पहिले १० देश

जपान

सिंगापुर

जर्मनी, दक्षिण कोरिया

फिनलैंड, इटली, लग्जमबर्ग, स्पेन

ऑस्ट्रिया, डेनमार्क

फ्रांस, आयरलैंड, नेदरलैंड, पोर्तुगाल, स्वीडेन

बेल्जियम, न्यूजीलैंड, नार्वे, स्विटजरलैंड, यूनाइटेड किंगडम, यूनाइटेड स्टेट

ऑस्ट्रेलिया, चेक रिपब्लिक, ग्रीस, माल्टा

कनाडा

हंगरी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -