घरदेश-विदेशRepublic Day : राजपथावरील सोहळा दिमाखात संपन्न!

Republic Day : राजपथावरील सोहळा दिमाखात संपन्न!

Subscribe

दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे अनोखे दर्शन यावेळी घडले.

पंतप्राधन नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तांदोलन केले.

- Advertisement -

लान्स नायक नझीर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या पत्नीने हा पुरस्कार स्विकारला आहे. नझीर अहमद वाणी हे आधी दहशतवादी होते. त्यांनी दहशतवादी संघटना सोडून भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता.

- Advertisement -

दिल्लीतल्या विजय चौक येथून संचलनाला सुरुवात झाली आहे. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेजाती सुभाष मार्ग इथून लाल किल्ला येथे परेडची सांगता होणार आहे. 22 राज्यांचे चित्ररथ तसंच केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या चित्ररथाचे दर्शन होणार आहे.


देशभरामध्ये ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजपथावर भारताचे लष्करी सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेचे अनोखे दर्शन यावेळी घडले. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला दिक्षिण अफ्रिकचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामण तसेच दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. दरम्यान, राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाला सकाळी ९च्या सुमारास सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्यासाठी राजपथावर देशवासियांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -