घरताज्या घडामोडीलिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या महिला पंतप्रधान, तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत

लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या महिला पंतप्रधान, तर भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत

Subscribe

ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार याबाबत अनेक दिवसांपासून लोकांना प्रतिक्षा होती. परंतु ही प्रतिक्षा आता संपली असून लिझ ट्रस या ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान झाल्या आहेत. ट्रस यांनी प्रतिस्पर्धी ऋषी सुनक यांना पराभूत केलं. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान झाल्या आहेत. लिझ ट्रस या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. त्यांच्या आधी थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या.

पंतप्रधान पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे उद्या काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे औपचारिक राजीनामा सुपूर्द करणार आहेत.

- Advertisement -

बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या भारतवंशी ऋषी सुनक यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला आहे. ऋषी सुनक यांच्यासह चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर हुजूर पक्षाच्या मंत्र्यांची आणि खासदारांच्या राजीनाम्याची लाट आली होती. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागला.

ऋषी सुनक यांच्या बंडामुळं बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लिझ ट्रस यांना पाठिंबा दिला होता आणि ऋषी सुनक यांच्याविरोधात जॉन्सन यांनी भूमिका घेतली होती. 1992 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी या सामन्यात 47 वर्षीय लिझ ट्रसच्या विजयाची घोषणा केली. ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत आणि पक्षाच्या नेतृत्वासाठी निवडणूक अधिकारीही होते.

- Advertisement -

हेही वाचा : सत्तेत आल्यानंतर ५०० रुपयांत सिलिंडर, मोफत वीज देऊ; गुजरात दौऱ्यात राहुल गांधींचं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -