घरCORONA UPDATELockdown: या १० राज्यांनी याआधीच वाढवला लॉकडाऊनचा कालावधी

Lockdown: या १० राज्यांनी याआधीच वाढवला लॉकडाऊनचा कालावधी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी १४ एप्रिल रोजी देशाला संबोधित करत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं जाहिर केलं. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित करण्याआधी १० राज्यांनी आधीच लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. देशातील १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा याआधीच केली. मेघालय, मिझोराम, पुद्दुचेरी, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा,पंजाब या राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या घोषणेपूर्वीच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली.


हेही वाचा – Lockdown: २१ दिवसांत ८ लाख कोटींचं नुकसान

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंजाब सरकारने लॉकडाऊनचा कालावधी वाढवून शुक्रवार ३० एप्रिलपर्यंत वाढवला. ओडिशानंतर पंजाब हे दुसरे राज्य बनलं. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय चंडीगडमध्ये पंजाबच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी यापूर्वीच राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते आणि म्हटलं होते की त्यांचं सरकार, निर्बंध हटवण्याची योग्य वेळ नसल्यामुळे ते वाढवण्यावर गांभीर्याने विचार करत आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याचं जाहिर केलं. राजस्थान आणि महाराष्ट्राने कोरोनाच्या वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवला. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला.

- Advertisement -

या १० राज्यांनी याआधीच वाढवला लॉकडाऊनचा कालावधी

१. मेघालय
२. मिझोराम
३. पुद्दुचेरी
४. अरुणाचल प्रदेश
५. तामिळनाडू
६. महाराष्ट्र
७. तेलंगणा
८. पश्चिम बंगाल
९. ओडिशा
१०. पंजाब

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -